कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात ठामपाच्या यंत्रणा पडल्या कमी, अजोय मेहतांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांती कानउघाडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 06:34 PM2020-06-12T18:34:21+5:302020-06-12T18:37:28+5:30

अधिकाऱ्यांची एवढी मोठी फळी असतांनाही ठाण्यात कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात कमी पडल्याचा ठपका ठेवत राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी ठाणे  महापालिकेच्या वरीष्ठ अधिका-यांची चांगलीच कान उघाडणी केली.

Ajoy Mehta visit Thane Municipal Corporation, Guided senior officers | कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात ठामपाच्या यंत्रणा पडल्या कमी, अजोय मेहतांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांती कानउघाडणी

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात ठामपाच्या यंत्रणा पडल्या कमी, अजोय मेहतांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांती कानउघाडणी

Next

ठाणे  - एक आयुक्त, त्यांच्या मदतीला दोन अतिरिक्त आयुक्त, इतर अधिकारी या शिवाय शासनाकडून आलेले दोन सनदी अधिकारी एवढी मोठी फळी असतांनाही ठाण्यात कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात कमी पडल्याचा ठपका ठेवत राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी ठाणे  महापालिकेच्या वरीष्ठ अधिका-यांची चांगलीच कान उघाडणी केली.  ठाण्यासह जिल्ह्यातील इतर महापालिकांची देखील हीच परिस्थिती झाली असल्याने त्यांनी शुक्रवारी ठाण्यात हजेरी लावली होती. अशी माहिती देखील महापालिकेच्या सुत्रंनी दिली. तर यापुढे कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी एक रुग्ण आढळला तर त्याच्या संपर्कातील कमीत कमी 20 लोकांना तत्काळ क्वॉरन्टाइन करा, रुग्ण तपासणींवर भर द्या, जास्तीत जास्त क्वॉरन्टाइन सेंटर वाढवा अशा महत्वाच्या सुचना राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिल्या. 

महापालिका मुख्यालयात ते कोरोना बाबत केलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्या समवेत राज्याचे नगरविकास (2) विभागाचे प्रधान सचिव महेश फाटक, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त लोकेश चंद्र, नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार, जिल्हाधिकारी राजेश नाव्रेकर, महापलिका आयुक्त विजय सिंघल आदींसह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी सर्व महापालिकांची एकत्र बैठक घेतली, मात्र ठाणे महापालिकेच्या पदाधिका:यांची स्वतंत्र बैठक घेतली. यावेळी त्यांनी सर्व वरीष्ठ अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली, तसेच खरडपटटी काढली. एक आयुक्त, दोन सनदी अधिकारी, नवीन अतिरिक्त आयुक्त आणि इतर अधिका:यांचा लवजमा असतांनाही ठाण्यात कोरोनाची साखळी तोडण्यात अजूनही अपयश का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. ठाण्यात आजच्या घडीला 4 हजाराहून अधिक कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत, दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे यावर आता वेळीच उपाय योजना करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. 

 जिल्हातील महापालिकांमध्ये कशा पध्दतीने कोरोना बाबत उपाय योजना करण्यात आल्या आहेत, याचा सविस्तर आढावा घेतला. कोरोनाला रोखण्यासाठी घरोघरी सव्र्हेक्षण करण्यावर भर देण्याबरोबरच एखाद्याला कोरोनाची लागण झाली असले तर त्याच्या संपर्कातील कमीत कमी 20 लोकांना तत्काळ क्वारन्टाइन करावे अशा सुचनाही त्यांनी केल्या. तसेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना क्वॉरन्टाइन करणो हाच महत्वाचा उपाय असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे क्वॉरान्टाइन सेंटरची क्षमता वाढवा अशा सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. तसेच क्वॉरन्टाइन सेंटरची क्षमता वाढविल्यास हॉस्पीटलची गरजही भविष्यात पडणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय झोपडपटटी भागात ताप सव्र्हेक्षण मोहीम तीव्र करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. तर झोपडपटटी भागात एखादा रुग्ण आढळला तर त्याला रुग्णालयातच उपचार द्यावेत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच औषधांचा पुरवठाही व्यवस्थीत ठेवा असेही त्यांनी यावेळी सांगितले. कंटन्मेट झोन तयार करा, त्याची व्याप्ती वाढवा, जेणो करुन त्या भागातील नागरीक इतर भागात जाणार नाहीत, याची काळजी घ्या. हॉस्पीटलमध्ये बेडची क्षमता वाढविण्याबरोबरच हॉस्पीटलची क्षमता वाढविण्याच्या महत्वाच्या सुचनाही त्यांनी दिल्या. 


 
राजकीय दबाव सहन करु नका
यावेळी त्यांनी वरीष्ठ अधिका:यांची कान उघाडणी तर केलीच, शिवाय कोणताही राजकीय दबाव काम करतांना असेल तर तो सहन करु नका, असेही त्यांनी सांगितले आहे. ठाण्यात अनेक कामांमध्ये राजकीय लुडबुड सुरु आहे. ती कोरोनाच्या काळातही तशीच दिसून आली आहे, त्यामुळे हाच मुद्दा धरती त्यांनी राजकीय दबाव सहन करु नका असा सल्लाही दिला आहे. त्यामुळे आता अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थतता पसरली आहे.

Web Title: Ajoy Mehta visit Thane Municipal Corporation, Guided senior officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.