कथ्थकमध्ये कल्याणच्या अजिती कुलकर्णी आणि वैष्णवी बिडवे यांचं सोनेरी यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 20:56 IST2018-11-26T20:53:30+5:302018-11-26T20:56:10+5:30

दुबई येथे झालेल्या आॅलिम्पियाड स्पर्धेत कथ्थक नृत्यात रौप्यपदकाची कमाई

ajitti kulkarni and vaishnavi bidwe wins silver in kathak in olympiad organised in dubai | कथ्थकमध्ये कल्याणच्या अजिती कुलकर्णी आणि वैष्णवी बिडवे यांचं सोनेरी यश

कथ्थकमध्ये कल्याणच्या अजिती कुलकर्णी आणि वैष्णवी बिडवे यांचं सोनेरी यश

कल्याण- अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, पुणे यांच्यातर्फे दुबई येथे घेण्यात आलेल्या आॅलिम्पियाड स्पर्धेत कथ्थक नृत्यात कल्याणच्या अजिती कुलकर्णी आणि वैष्णवी बिडवे यांनी रौप्यपदक पटकाविले आहे. या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रविंद्र कला विद्यालयात गुरू स्मिता परांडेकर यांच्याकडून दोघींही कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेत आहेत. अजिती आणि वैष्णवी या बारावीत शिकत असून त्या विशारदच्या विद्यार्थ्यांनी आहेत. गेली दहा वर्षे त्या नृत्याचे प्रशिक्षण घेत आहे. या दोघींनी आॅल इंडिया स्पोर्ट्स डान्स कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी राज्य पातळीवर पहिले पारितोषिक पटकाविले आहे. कोल्हापूर आणि मैसूर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली आहे. आंतरशालेय आणि आंतरमहाविदयालयीन स्पर्धेत ही त्यांनी अनेक बक्षीसे मिळविली आहे.

Web Title: ajitti kulkarni and vaishnavi bidwe wins silver in kathak in olympiad organised in dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण