ठाण्यात विवाहितेचा विनयभंग करणा-या हवाई दलाच्या कर्मचा-यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 20:28 IST2019-10-29T20:22:02+5:302019-10-29T20:28:41+5:30
एका ४० वर्षीय महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाºया दिनेश विठ्ठल चव्हाण (४३) या हवाई दलाच्या कर्मचा-याला नौपाडा पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा प्रकाराची वाच्यता करुन समाजात बदनामी करण्याची त्याने तिच्या पतीलाही धमकी दिली होती.

बदनामी करण्याची पतीलाही दिली धमकी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अश्लील शिवीगाळ करून एका ४० वर्षीय महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणा-या दिनेश विठ्ठल चव्हाण (४३) या हवाई दलाच्या कर्मचा-याला नौपाडा पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
नौपाडा परिसरात राहणारी ही पीडित महिला २१ आॅक्टोबर रोजी रात्री १०.३० ते २८ आॅक्टोबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घरी असतांना दिनेश त्यांच्या घरी आला. त्याने तिच्यासोबत आपले अनैतिक संबंध असून आणखी पैसे दे नाहीतर तिची बदनामी करेल, अशी धमकी तिच्या पतीला दिली. तिला अत्यंत हीन आणि अश्लील शिवीगाळ करून घरातच तिच्याशी लगट करून शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती केली. तिने त्याच्या या प्रकाराला स्पष्ट नकार दिल्यानंतर तिला त्याने मारहाण केली. तसेच तिचा विनयभंगही केला. याप्रकरणी तिने २८ आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या पथकाने कोलशेत येथील हवाई दलाच्या कार्यालयात प्रशासकीय विभागामध्ये लिपीक असलेल्या दिनेश याला सोमवारी रात्री अटक केली. पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.