कृषीमंत्री दादा भुसे अचानक बांधावर, शेतकऱ्याचा डब्बाही खाल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 20:54 IST2020-07-16T20:52:00+5:302020-07-16T20:54:20+5:30
शेतकऱ्यांच्या अडी-अडचणींचा घेतला आढावा.

कृषीमंत्री दादा भुसे अचानक बांधावर, शेतकऱ्याचा डब्बाही खाल्ला
शाम धुमाळ
ठाणे/कसारा - शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे हे मुंबईहुन नाशिककडे जात असताना त्यांनी मुंबई नाशिक महमार्गवरील कसारा घाट लगतच्या एका शेतात अचानक भेट दिली. या शेतात बांधावर शेतकरी मेहनत घेत असल्याचे दिसले. (लतीफवाडी) येथील सुनील दशरथ मांगे यांच्या बांधावर जाऊन नामदार भुसे यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
शेतकऱ्यांना या भागात काय काय अडचणी आहेत त्या जाणून घेतल्या. तसेच, गावात कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक येतात का, बी-बियाणे, खते, औषधे यांची विचारपूस केली. यावेळी शेतकऱ्यांनीही आपल्या समस्यांचा पाडा वाचला कृषीमंत्री भुसे यांनी बांधावर असलेल्या शेतकऱ्याचा डब्बा घेऊन तो शेतकऱ्याच्या आग्रहास्तव खाल्ला. आपल्या बांधावर मंत्री आल्याने शेतकरी मांगे यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. दरम्यान ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील साहेब ,मा .आमदार पांडुरंग बरोरा साहेब,जि.प.अध्यक्षा सुषमा लोणे,बांधकाम सभापती वैशालीताई चंदे,समाज कल्याण सभापती संगीताताई गांगड, तालुका प्रमुख मारुती धिर्डे, आकाश सावंत,काशिनाथ तिवरे,जि. प सदस्य मंजुषा जाधव,विठ्ठल भगत,चंद्रकांत जाधव,अजय सिंग,किशोर शेलवले,धिरज झुगरे आदी मान्यवर व शिवसैनिक उपस्थित होते