मारहाणीने आठवले समर्थकांमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 11:54 PM2018-12-09T23:54:19+5:302018-12-09T23:54:56+5:30

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना प्रविण गोसावी या तरुणाने मारहाण केल्याने रिपाइं कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी निषेध व्यक्त करुन आरोपीविरूद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

Aggravated by the Marwani Athavale supporters | मारहाणीने आठवले समर्थकांमध्ये संताप

मारहाणीने आठवले समर्थकांमध्ये संताप

Next

अंबरनाथ : येथील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना प्रविण गोसावी या तरुणाने मारहाण केल्याने रिपाइं कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी निषेध व्यक्त करुन आरोपीविरूद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

अंबरनाथमध्ये रिपाईच्या वतीने आयोजित केलेल्या संविधान दिनाच्या कार्यक्रमामध्ये व्यासपिठावरुन उतरल्यानंतर रामदास आठवले यांना रिपाइंचा बंडखोर कार्यकर्ता प्रविण गोसावी याने मारहाण केल्याची घटना घडली. कार्यकर्त्यांनी त्याला जबर मारहाण केल्यानंतर पोलिसांनी त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र प्रकृती खराब असल्याने त्याला मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.

पोलीस बंदोबस्तातील त्रुटींवर बोट ठेऊन रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांना केली. आठवले केंद्रीय मंत्री असतानाही त्यांना योग्य सुरक्षा पुरवली नाही, असा आरोप रिपाइंचे शहराध्यक्ष अजय जाधव यांनी केला. संतप्त कार्यकर्त्यांनी अंबरनाथ बंदची हाक देऊन स्टेशन परिसरात व्यापाºयांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. अनुचित प्रकार घडू नये यासाठी व्यापाºयांनी बंद पाळला. रिक्षा सेवाही बंद राहिल्याने नागरिकांचे हाल झाले. रिपाइंचे विभागीय अध्यक्ष देवीदास भोईर यांच्या रविवारी कसारा येथे बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये लहान मोठे व्यापारी, भाजी विक्रेते तसेच रिक्षा आणि टॅक्सी चालकांनीही सहभाग घेतला. रस्त्यावर एसटी महामंडळाच्या बसेसही तुरळक प्रमाणात होत्या. कसारा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कुंदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी चोख पोलीस बंदोबस्त होता. बंददरम्यान कसारा येथील पक्ष कार्यालयानजीक निषेध सभा घेऊन आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या सभेस सुहास जगताप, किशोर जाधव, राजू उबाळे, संतोष कर्डक, कुणाल गांगुर्डे आदी पदाधिकाºयांसह शेकडो आठवले समर्थक उपस्थित होते. सायंकाळी चार वाजताच्या सुमारास कार्यकर्त्यांनी कसारा बाजारपेठ मार्गे रॅली काढून कसारा रेल्वे स्थानकावर धडक दिली. तिथे कसाराहून मुंबईला जाणारी लोकल कार्यकर्त्यांनी अडवली. यावेळी देवीदास भोईर, रविंंद्र शेजवळ, प्रशांत मोरे, शांताराम शेजवळ, किरण सोनवणे यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मुरबाडमध्ये रॅली
मुरबाड : आठवले यांच्यावरील हल्ल्यामुळे आंबेडकरी जनतेत संतापाची लाट उसळली असून, रिपाइंचे ठाणे जिल्हाध्यक्ष बाळाराम गायकवाड यांच्या आदेशानुसार तालुकाध्यक्ष दिनेश उघडे, युवा अध्यक्ष अण्णा साळवे, विशाल चंदने, गुरु नाथ खोलांबे, संजय खोलांबे, संतोष उघडे, भूपेश साटपे, कैलास देसले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मुरबाड शहरात निषेध रॅली काढून व्यापाºयांना दुकाने बंद करण्याचे अवाहन केले. हल्ल्यास जबाबदार असणाºया पोलीस अधिकाºयांवर कारवाई आणि हल्लेखोर प्रविण गोसावी याला कठोर शिक्षा करण्याच्या मागणीसाठी मुरबाडचे पोलीस निरिक्षक अजय वसावे यांना निवेदन देण्यात आले.

उल्हासनगरमध्ये संमिश्र प्रतिसाद
उल्हासनगर : रिपाइंने दिलेल्या उल्हासनगर बंदच्या हाकेला समिश्र प्रतिसाद मिळाला. रिपाइंच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निषेधाच्या घोषणा दिल्या. आरोपीला धडा शिकविण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. रिपाइंचे शहराध्यक्ष भगवान भालेराव यांच्यासह इतर पदाधिकाºयांनी दिलेल्या बंदच्या हाकेला व्यापाºयांनी प्रतिसाद देवून दुकाने बंद ठेवली. पुर्वेला बंदचा फारसा प्रतिसाद जाणवला नाही. भगवान भालेराव यांच्यासह जनार्धन ढगे, शोभा जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सकाळीच रस्त्यावर उतरून मारहाणीचा निषेध केला.

Web Title: Aggravated by the Marwani Athavale supporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.