शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पवार, मुंडे यांच्यावरील आराेप सहन करणार नाही; आनंद परांजपेंचा आव्हाडांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 06:13 IST

सूरज परमार या विकासकाच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पालिकेचे विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला, गटनेते हनमंत जगदाळे यांना अटक झाली तेव्हा आव्हाड आपण स्वतःला वाचविण्यासाठी कोणाकोणाकडे गेला हाेतात?

ठाणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बेछूट आराेप सहन केले जाणार नाहीत. सूरज परमार आत्महत्याप्रकरणी काेणाच्या दरवाजावर डाेके टेकवायला जात हाेतात, अभियंता अनंत करमुसे यांना पाेलिस संरक्षणात मारहाण करण्याचा बालिशपणा का केलात आणि पाेलिस हवालदार वैभव कदम यांच्या आत्महत्येस काेण जबाबदार आहे, या तीन प्रश्नांची उत्तरे जितेंद्र आव्हाड यांनी द्यावीत, असे जाहीर आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत आव्हाड यांना दिले.

कर्जत येथे वैचारिक मंथन शिबिरात समारोपाच्या भाषणात बोलताना २००४ ते २०२३ पर्यंत वेगवेगळ्या वर्षी पक्षातील घटनांची सविस्तर माहिती अजित पवार यांनी दिली. अजित पवार नेहमीच खरे बोलतात यामुळे त्यांनी जे सांगितले आहे ते सर्वस्वी खरेच असल्याचा दावाही  परांजपे यांनी केला.

एक दगड माराल तर आम्ही दोन दगड मारू सूरज परमार या विकासकाच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पालिकेचे विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला, गटनेते हनमंत जगदाळे यांना अटक झाली तेव्हा आव्हाड आपण स्वतःला वाचविण्यासाठी कोणाकोणाकडे गेला हाेतात? तत्कालीन सहपोलिस आयुक्त लक्ष्मीनारायण यांच्याकडे का गेला होतात? हे एकदा  जाहीर करा. करमुसे यांना अमानुष मारहाणप्रकरणी ५ ऑगस्ट २०२० राेजी रात्री ८ वाजता आपल्या घरी येऊन विनंती केली होती की, असे करू नका. तरी आपल्या खूशमस्कऱ्यांचे ऐकून कॅबिनेट मंत्री असतानाही आपण पोलिसांसमोरच करमुसे यांना बेदम मारहाण करून बालिशपणा दाखवलात. या तीन प्रश्नांची उत्तरे द्या. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर बेलगाम आरोप करण्याअगोदर आपणही काचेच्या घरात राहतोय, आपण एक दगड माराल तर आम्ही दोन दगड मारू शकतो हे लक्षात ठेवा, असा इशाराही  परांजपे यांनी  दिला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस