अंत्यसंस्कारानंतर कुटुंबीयांच्या मृत्यूची आजीला दिली कल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 05:35 IST2017-08-29T05:35:24+5:302017-08-29T05:35:53+5:30

पलिताना-वडोदरा महामार्गावर जीप व गॅस सिलिंडर वाहून नेणाºया ट्रकमध्ये, रविवारी पहाटे झालेल्या अपघातात, डोंबिवलीतील शहा कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाला.

After the funeral, the grandfather's grandfather's death | अंत्यसंस्कारानंतर कुटुंबीयांच्या मृत्यूची आजीला दिली कल्पना

अंत्यसंस्कारानंतर कुटुंबीयांच्या मृत्यूची आजीला दिली कल्पना

डोंबिवली : पलिताना-वडोदरा महामार्गावर जीप व गॅस सिलिंडर वाहून नेणाºया ट्रकमध्ये, रविवारी पहाटे झालेल्या अपघातात, डोंबिवलीतील शहा कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेले हितेश शहा यांच्या ८० वर्षांच्या आई हसुमती हा धक्का सहन करतील की नाही, याबाबत साशंकता होती. शहा कुटुंबीयांवर रविवारी गुजरातमध्ये अंत्यसंस्कार झाल्यावर, रात्री उशिरा हसुमती यांना कुटुंबीयांच्या मृत्यूची बातमी सांगण्यात आली. ही बातमी ऐकून त्या सुन्न व नि:शब्द झालेल्या.
डोंबिवली पूर्वेतील निशिगंधा इमारतीतील किरण कमलेश शहा, मुलगी जिनाली, मुलगा नेमिल, नीळकंठ तर पूजा इमारतीत राहणारे शशिकांत शहा, त्यांची पत्नी रिटा शहा, मुलगी धरा, वीणा सोसायटीत राहणारे हितेश शहा, त्यांची पत्नी विभा शहा, भाचा नंदीप शहा यांचा मृत्यू झाला आहे. कमलेश, शशिकांत सख्ख्ये भाऊ होते, तर हितेश आतेभाऊ होता. हितेश यांची आई हसुमती ८० वर्षांच्या असल्याने, त्या कुटुंबांसोबत कुलदैवताच्या दर्शनासाठी जाऊ शकल्या नाहीत. २७ आॅगस्टला पहाटे शहा कुटुंबाचा अपघाती मृत्यू झाला. रविवारी सकाळपासून इमारतीच्या आसपास गर्दी होती. काहीतरी विपरित घडले आहे, हे हसुमती यांना कळले पण ते आपल्याच कुटुंबाबाबत आहे, हे त्यांना माहीत नव्हते. जेव्हा त्यांना हे समजले तेव्हा त्या सुन्न झाल्या. वृद्धावस्थेत त्यांना हा दिवस पाहावा लागला, याविषयी शेजाºयांना चुटपुट लागली आहे.

Web Title: After the funeral, the grandfather's grandfather's death

टॅग्स :Accidentअपघात