डोंबिवलीत रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची केली तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 17:09 IST2018-01-07T17:09:14+5:302018-01-07T17:09:35+5:30

कल्याण येथे रुग्णाचा मृत्यू झाल्याप्रकरणी होलिक्रॉस हॉस्पिटलमध्ये तोडफोडीची घटना महिनाभरापूर्वी घडली असताना रविवारी डोंबिवली एमआयडीसी भागातील एम्स रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी तोडफोडीची घटना घडली.

After the death of Dombivliite patient, the relatives of the hospital decided to tamper with the relatives | डोंबिवलीत रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची केली तोडफोड

डोंबिवलीत रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची केली तोडफोड

डोंबिवली: कल्याण येथे रुग्णाचा मृत्यू झाल्याप्रकरणी होलिक्रॉस हॉस्पिटलमध्ये तोडफोडीची घटना महिनाभरापूर्वी घडली असताना रविवारी डोंबिवली एमआयडीसी भागातील एम्स रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी तोडफोडीची घटना घडली. या घटनेत रुग्णालयातील एक कर्मचारी जखमी झाला आहे.

नीलम पाटील असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. नीलम ही निळजे गावातील रहिवासी असून निमोनियाच्या आजारानं ती त्रस्त होती. तिला काल मध्यरात्री रुग्णालयात उपचारार्थ एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याने त्यात तिचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. दरम्यान, तिच्या मृत्यूची माहिती मिळताच संतप्त झालेल्या रुग्णाच्या आठ ते दहा नातेवाईकांनी रुग्णालयातील एलसीडी टीव्ही आणि प्रवेशद्वाराच्या काचेच्या दरवाजाची तोडफोड केली.

नातेवाईकांनी केलेल्या हल्ल्यात रुग्णालयातील वाहनचालक अजय जाधव जखमी झाला आहे. त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. घटनास्थळी स्थानिक मानपाडा पोलिस पोहोचले असून तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले यांनी सांगितले. निलम हिच्यावर योग्य उपचार झाले तिला रुग्णालयात आणले तेव्हाच तीची प्रकृती चिंताजनक होती तिला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते परंतु फुफ्फुसाचा आजाराने तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्टीकरण एम्स चे जनसंपर्क अधिकारी अवदेश शर्मा यांनी दिले.

Web Title: After the death of Dombivliite patient, the relatives of the hospital decided to tamper with the relatives