अखेर सर्वसामान्यांची ‘रिक्षा बंद’पासून सुटका
By Admin | Updated: August 18, 2015 01:49 IST2015-08-18T01:49:29+5:302015-08-18T01:49:29+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सीएनजी पंपाच्या अभावामुळे शेकडो रिक्षाचालकांसह अन्य वाहनचालकांना उल्हासनगर, महापे, नवी मुंबई आदी

अखेर सर्वसामान्यांची ‘रिक्षा बंद’पासून सुटका
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सीएनजी पंपाच्या अभावामुळे शेकडो रिक्षाचालकांसह अन्य वाहनचालकांना उल्हासनगर, महापे, नवी मुंबई आदी ठिकाणी जावे लागते. राज्य शासनासह केंद्र शासनात, महापालिकेत सत्ता असूनही त्या सुविधेपासून लाखो वाहनधारकांना वंचित ठेवले जात आहे. त्यासाठीच येथील रिक्षा संघटनांपैकी एका युनियनने २० आॅगस्ट रोजी रिक्षाबंदचा नारा दिला होता. परंतु, त्यातून सर्वसामान्यांचे हाल होऊ नयेत, यासाठी आमदार रवींद्र चव्हाण यांनी सर्व युनियन पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. त्यात सर्वसंमतीने बंद केला जाणार नसल्याचे ठरले.
यावेळी खासदार श्रीकांत शिंदेसह सर्व रिक्षा युनियन पदाधिकाऱ्यांसह सुमारे २०० हून अधिक रिक्षाचालकही उपस्थित होते.