शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

१५ वर्षांनंतर बंदरवाडीच्या रहिवाशांना घरे; चाव्या हातात आल्यावर अश्रू तरळले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 10:50 PM

वीज, पाण्याअभावी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर काढले दिवस

भाईंदर : रेल्वेच्या जागेतील घरे तोडल्यानंतर १५ वर्षे नवघर गावामागील महापालिकेने टाकलेल्या कचºयाच्या ढिगाºयावर वीज, पाण्याअभावी असह्य जीवन जगणाºया ११३ कुटुंबांचे महापालिकेने इंद्रलोकमधील एका इमारतीत पुनर्वसन केले आहे. उकिरड्यावर जगत हक्काच्या घरांसाठी १५ वर्षे चाललेल्या संघर्षाचा अखेर सुखद असा शेवट झाला. घरांच्या चाव्या हातात मिळाल्यानंतर रहिवाशांना अश्रू अनावर झाले.

भाईंदर पूर्वेला बंदरवाडी येथे रेल्वेच्या जागेत ९० च्या दशकापासून सुमारे १३० कुटुंबे राहत होती. १९९५ पूर्र्वीच्या झोपडपट्टीवासीयांना अधिकृत ठरवले असतानाही रेल्वे प्रशासनाने मात्र हा नियम आम्हाला लागू होत नसल्याचे स्पष्ट करत महापालिकेच्या मदतीने मोठ्या पोलीस बंदोबस्तात येथील घरे तोडली होती. तोडलेल्या झोपड्यांपैकी १२८ जणांना महापालिकेने पात्र झोपडीधारक म्हणून फोटोपास दिले होते. तत्कालीन आयुक्त शिवमूर्ती नाईक यांनी बाधित झोपडपट्टीधारकांची नोंद करून घेत पर्यायी व्यवस्था होईपर्यंत नवघर स्मशानभूमीमागील सरकारी जागेत शहराचा कचरा टाकून केलेल्या भरावावर राहण्यास परवानगी दिली होती. तेव्हापासून बहुतांश झोपडीधारक कचºयाच्या ढिगाºयावरच झोपड्या बांधून राहत होते.

सीआरझेड व कांदळवन क्षेत्र असल्याने रहिवाशांना महापालिकेने पाण्याची जोडणी दिली नाही. वीजपुरवठाही मिळाला नव्हता. पावसाळ्यात तर परिस्थिती बिकट होत असे. अशा दुरवस्थेतही हक्काचे छप्पर मिळेल, या आशेने या कुटुंबीयांनी येथे एकदोन दिवस नाही, तर आयुष्याची १५ वर्षे काढली.हक्काचे घर मिळावे म्हणून महापालिकेच्या मुख्यालयापासून नगरसेवक, आमदार, जिल्हाधिकारी ते सरकार दरबारी लढा दिला.राजकारण बाजूला ठेवून दिला न्यायपुनर्वसनाचा हक्क असूनही या रहिवाशांना इतकी वर्षे यातना सोसत राहावे लागले, याचे दु:ख वाटत होते. महापौर असताना जेव्हा हे रहिवासी मोठ्या आशेने माझ्याकडे आले, त्यावेळी ठरवले की, यांना त्यांच्या लढ्यात पूर्ण साथ द्यायची. राजकारण बाजूला ठेवून माझा प्रभाग नसताना केवळ त्यांना चांगले घर मिळावे, हाच उद्देश होता. आयुक्तांसह कार्यकारी अभियंता व महापालिकेनेही त्यांना न्याय दिला.- गीता जैन, माजी महापौर

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर