शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाची टोलवाटोलवी

By admin | Updated: October 27, 2016 03:48 IST

शहरातील अनेक मॉल आणि हॉटेलच्या पोटमाळ्यांमध्ये हॉटेल सुरू असून त्यावर कारवाईची मागणी मागील स्थायी समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी केली होती.

ठाणे : शहरातील अनेक मॉल आणि हॉटेलच्या पोटमाळ्यांमध्ये हॉटेल सुरू असून त्यावर कारवाईची मागणी मागील स्थायी समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी केली होती. त्यानुसार, सर्व्हे करून अहवाल सादर केल्यानंतर ती केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. परंतु, बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अतिक्रमण विभागाने परवाना विभाग, परवाना विभागाने आरोग्य विभाग, आरोग्य विभागाने अग्निशमन विभाग, अग्निशमन विभागाने अन्न औषध प्रशासन अशी जबाबदारी ढकलून पळ काढला. त्यामुळे कारवाई कोण करणार, असा सवाल करून सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. मागील बैठकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास देसाई यांनी शहरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या, पोटमाळ्यांमधील हॉटेलच्या मुद्याला हात घालून यावर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार, पुढील बैठकीत यासंदर्भातील अहवाल सादर केला जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. त्यानुसार, बुधवारी झालेल्या बैठकीत देसाई यांनी पुन्हा या मुद्याला हात घालून अग्निशमन विभागाने काय कारवाई केली, असा सवाल केला. यावर, अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी शशिकांत काळे यांनी कारवाईचे अधिकार हे अन्न औषध प्रशासनाचे असल्याचे सांगितले. त्यानंतर, अतिक्रमण विभागाने यावर का कारवाई केली नाही, असा सवाल त्यांनी केला. परंतु, हे अधिकार परवाना विभागाचे असल्याचे सांगून अतिक्रमण विभागानेही यातून काढता पाय घेतला. दुसरीकडे आरोग्य विभागानेदेखील दुसऱ्या विभागाकडे बोट दाखवले. त्यामुळे आता या पोटमाळ्यांमधील हॉटेलवर कारवाई कोण करणार, असा सवाल करून सदस्यांनी प्रशासनाला अडचणीत आणले. अग्निशमन विभागाने यासंदर्भात माहिती देताना एखाद्या ठिकाणी आगीने दुर्घटना होण्याची शक्यता असेल अथवा जीवितहानी होत असेल, तर त्याची माहिती सहायक आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना द्यायची असते, तसेच सहायक आयुक्तांनी दर दोन वर्षांनी अशा आस्थापनांचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल आयुक्तांना देऊन कारवाई करायची अथवा नाही, याचा निर्णय घ्यायचा असतो. (प्रतिनिधी)चेंडू अतिक्रमणकडेअग्निशमन विभागाने दिलेल्या उत्तरामुळे अतिक्रमण विभागाकडे पुन्हा हा चेंडू वळला आणि त्यांनी त्यानुसार अहवाल सादर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर, येत्या १५ दिवसांत यासंदर्भातील अहवाल सादर करावा, असे आदेश स्थायी समिती सभापती संजय वाघुले यांनी दिले.