उल्हासनगरातील रस्ते खड्ड्यासाठी अतिरिक्त आयुक्त मैदानात; काही तासात रस्ते दूरस्ती सुरू झाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 18:35 IST2025-11-13T18:35:04+5:302025-11-13T18:35:29+5:30
उल्हासनगरात रस्त्यातील खड्ड्या विरोधात सर्वच पक्ष नेत्यांनी आवाज उठविल्यावर, रस्त्यातील खड्डे भरण्याचे संकेत आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी दिले होते. रस्त्यातील खड्ड्याची पाहणी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त धीरज चव्हाण हे आता मैदानात उतरले.

उल्हासनगरातील रस्ते खड्ड्यासाठी अतिरिक्त आयुक्त मैदानात; काही तासात रस्ते दूरस्ती सुरू झाली
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहर पूर्वेतील पवई चौक, श्रीराम चौक, कैलास कॉलनी, मच्छी मार्केट आदी रस्त्यातील खड्ड्याची पाहणी अतिरिक्त आयुक्त धीरज चव्हाण यांनी बुधवारी केली. त्यानंतर काही तासात रस्ते दूरस्ती सुरू झाली.
उल्हासनगरात रस्त्यातील खड्ड्या विरोधात सर्वच पक्ष नेत्यांनी आवाज उठविल्यावर, रस्त्यातील खड्डे भरण्याचे संकेत आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी दिले होते. रस्त्यातील खड्ड्याची पाहणी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त धीरज चव्हाण हे आता मैदानात उतरले. त्यांनी बुधवारी शहर पूर्वेतील श्रीराम चौक, पवई चौक, कैलास कॉलनी, मच्छी मार्केट, तहसील रस्ता आदी रस्त्याची पाहणी केली. अतिरिक्त आयुक्त चव्हाण यांच्या रस्ते पाहणीनंतर संध्याकाळी रस्ते दूरस्तीचे काम सुरू झाले. पावसाळ्यात रस्ते दुरस्तीवरून विरोधकांनी रान उठविल्यानंतर आमदार कुमार आयलानी यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिल्यावर, आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी त्याच रात्रीपासून रस्ता दूरस्तीला सुरुवात केली होती. दिवाळी सणा दरम्यान पुन्हा रस्ता दूरस्ती व रस्ते खड्यावरून आयुक्ताना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला.
आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी रस्ते सुसाट करण्यासाठी निविदा विना रस्ते दुरस्तीचे काम दिवाळी सणा दरम्यान सुरू केले. रस्ते बऱ्या पैकी सुसाट झाल्यावर, शहर पूर्वेतील रस्ते खड्ड्याचा प्रश्न ऐरणीवर आला.
दरम्यान रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी अतिरिक्त आयुक्त धीरज चव्हाण हे मैदानात उतरल्याचे चित्र आहे. चव्हाण यांनी शहर पूर्वेतील रस्त्याची पाहणी केल्यानंतर, काही तासात रस्ते दूरस्तीला सुरवात झाली. महापालिकेने पावसाळ्यात रस्ते दूरस्तीसाठी अडडीच कोटीची तरतूद केल्याची माहिती बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यानंतर दिवाळी दरम्यान रस्ते दूरस्तीवरील खर्च गुलदश्त्यात असून पुन्हा तिसऱ्या टप्प्यात रस्ते दूरस्ती सुरू केल्याचे बोलले जात आहे. पावसाळ्या पासून आज प्रयत्न रस्ते दूरस्ती व रस्ते खड्डे भरण्यावर एकूण किती खर्च केला. याची माहिती पारदर्शकपणे नागरिकांना देण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली.