शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

आंबिवलीच्या ‘एनआरसी’ची जागा घेण्यास अदानी कंपनी इच्छुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 06:18 IST

कामगारांची थकबाकी सुमारे ९८४ कोटी : व्यवहार झाल्यास थकबाकीचा मार्ग मोकळा

कल्याण : आंबिवली येथील बंद असलेल्या एनआरसी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची देणी थकीत आहेत. ही देणी देण्याबाबत ९८४ कोटी ८३ लाख रुपयांचा क्लेम कंपनी व्यवस्थापनाने केला आहे. दरम्यान, कंपनीची जागा घेण्यास तीन कंपन्यांनी तयारी दर्शवली आहे. त्यापैकी अदानी कंपनीने जागेच्या बदल्यात सर्वाधिक रक्कम मोजण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे ही जागा अदानीला दिल्यास कर्मचाऱ्यांच्या थकबाकीचा विषय तातडीने मार्गी लागू शकतो.

आशिया खंडातील सगळ्यात मोठी कंपनी असा एकेकाळी नावलौकिक असलेल्या एनआरसी कंपनी व्यवस्थापनाने ९ नोव्हेंबर २००९ रोजी आर्थिक कारण पुढे करत कंपनीला टाळे ठोकले. तेव्हापासून आजपर्यंत कर्मचाऱ्यांना थकीत देणी दिलेली नाहीत. कर्मचाऱ्यांच्या थकबाकीचा विषय यापूर्वी बीआयएफआरकडे प्रलंबित होता. २०१४ मध्ये केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यावर बीआयएफआर बरखास्त करण्यात आले. त्यामुळे हे प्रकरण एनआरसीटीकडे आले. एनआरसी कंपनी संघर्ष समितीने यासाठी दिल्लीपर्यंत पाठपुरावा केला होता. कंपनीने पंजाब नॅशनल बँकेकडून नव्या प्रकल्पासाठी कर्ज घेतले होते. या बँकेने न्यायालयाकडून कंपनी दिवाळखोरीत निघाल्याचे प्रमाणपत्र मिळवले आहे. थकीत देणी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी इंटेरियम रिसोल्युशन प्रोफेशनल म्हणून विकास प्रकाश गुप्ता यांची नियुक्ती केली आहे. गुप्ता यांच्यामार्फत कर्मचाºयांच्या थकीत रकमेचा क्लेम भरला असून ते न्यायालयास अहवाल सादर करणार आहेत.

कर्मचाऱ्यांचा थकीत रकमेचा हिशेब व त्यावर १८ टक्के व्याज, असा एकूण रकमेचा त्यात समावेश असणार आहे. कंपनीच्या चार हजार ४१ कामगारांची ९८४ कोटी ८३ लाख रुपयांची थकबाकी आहे. २२ मार्च २०१८ रोजी हे क्लेम कंपनीने भरून दिले आहेत. डिसेंबर २०१८ अखेर हा विषय निकाली काढणे अपेक्षित होते. एनआरसी कंपनी संघर्ष समितीने त्यासाठी तीन वर्षे पाठपुरावा केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष भीमराव डोळस यांनी दिली आहे. 2007 मध्ये कंपनी व्यवस्थापनाने ३४५ एकर जागा १६९ कोटी रुपयांना रहेजा बिल्डरला विकण्याचा करार केला होता. त्यापैकी ५७ कोटी रुपये कंपनी व्यवस्थापनाला दिल्याची माहिती कामगार संघटनांना मिळाली होती.व्यवस्थापनाने कंपनी डबघाईला आल्याचे कारण पुढे करत २००९ मध्ये टाळे ठोकले. परंतु, त्याआधीच २००७ मध्ये जागेचा व्यवहार केल्याने कर्मचाºयांनी उठाव केला. कंपनी बंद करण्याच्या हालचाली २००७ पासून जागा विकण्याच्या माध्यमातून सुरू झाल्याचा आरोप संघटनांनी केला.

कंपनीकडून मालमत्ताकरापोटी कोट्यवधींची थकबाकी कल्याण-डोंबिवली महापालिकेस येणे बाकी आहे. मग, जागाविक्रीसाठी नाहरकत दाखला कशाच्या आधारे महापालिकेने दिला. हा विषयही तेव्हा गाजला होता. दुसरीकडे रहेजा बिल्डरने कंपनीनजीक असलेली कामगारांची कॉलनी रिकामी करून द्या, असे म्हटले होते. त्यानंतरच, उर्वरित रक्कम कंपनीला दिली जाईल. त्यामुळे जागाखरेदीचा व्यवहार फिस्कटला. मात्र, हा व्यवहार रद्द झाला की नाही, याविषयी ठोस माहिती कंपनीने दिली नसल्याचे सांगण्यात येते. अदानीने या जागेसाठी तीन हजार १८ कोटी रुपये देण्याचे नमूद केले आहे. त्यासाठी या तिन्ही कंपन्यांनी ५० लाखांचा डिमांड ड्राफ्ट दिला आहे. या प्रक्रियेसाठी १८ महिन्यांचा कालावधी दिला गेला होता. मात्र, तो संपुष्टात आला आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त रक्कम देण्याची तयारी दर्शवणाऱ्या अदानीला ही जागा कंपनीने विकल्यास कामगारांच्या थकबाकीचा प्रश्न तातडीने निकाली निघू शकतो, अशी अपेक्षा कामगारांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका