कोविड हॉस्पीटलमध्ये तमिळ, तेलगू अन् हिंदी अभिनेत्री कामाला, मोठ्या घोळाची चौकशी करा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 08:50 AM2021-05-30T08:50:39+5:302021-05-30T08:52:14+5:30

एवढ्या मोठय़ा सेलेब्रिटीला फ्रन्ट लाइन वर्कर म्हणून काम करण्याची गरजच काय? असा सवाल उपस्थित करीत चुकीच्या पध्दतीने ओळखपत्र बनवून देणाऱ्या संबंधित एजन्सीवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपच्यावतीने करण्यात आली आहे.

Actress mira chopra at Covid Hospital of thane, inquire into the big mess, niranjan davkhare deamdn probe | कोविड हॉस्पीटलमध्ये तमिळ, तेलगू अन् हिंदी अभिनेत्री कामाला, मोठ्या घोळाची चौकशी करा 

कोविड हॉस्पीटलमध्ये तमिळ, तेलगू अन् हिंदी अभिनेत्री कामाला, मोठ्या घोळाची चौकशी करा 

googlenewsNext
ठळक मुद्दे कोविड सेंटरमधील आरोग्य सेवकांच्या नेमणूकांमध्येही मोठा घोळ समोर येऊ शकतो. त्यामुळे, आयुक्तांनी ताबडतोब या घटनेची सखोल चौकशी करावी, असेही डावखरे यांनी म्हटले आहे.

ठाणे - सर्वसामान्यांसाठी लसींचा तुटवडा असल्याचे महापालिका सांगत आहे. त्यामुळे लस मिळविण्यासाठी सर्वसामान्य ठाणेकर तासंनतास रांगेत उभा राहत आहे. परंतु दुसरीकडे १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद असतांनाही ठाणे महापालिकेच्या पार्कीग प्लाझा येथील कोविड सेंटरमध्ये सुपरवाझर असल्याचे भासवून चक्क एका महिला सेलेब्रिटीने लसीकरण करुन घेतल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या अभिनेत्रीला फ्रन्ट लाइन वर्करचे ओळखपत्र देणारी संस्था देखील या निमित्ताने आता अडचणीत आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी शहर भाजपच्यावतीने करण्यात आली आहे. आमदार निरंजन डावखरे यांनी या महिलेचे ओळखपत्र शेअर करत संबंधित घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. 

एवढ्या मोठय़ा सेलेब्रिटीला फ्रन्ट लाइन वर्कर म्हणून काम करण्याची गरजच काय? असा सवाल उपस्थित करीत चुकीच्या पध्दतीने ओळखपत्र बनवून देणाऱ्या संबंधित एजन्सीवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपच्यावतीने करण्यात आली आहे. भाजपा नेते आमदार निरंजन डावखरे यांनी ट्विटरवरुन व्हिडिओही शेअर केला आहे. ठाणे कोविड केअर सेंटर, पार्किंग प्लाझा हे ओम साई केअर सेंटरमार्फत चालविण्यात येते. मात्र, या एजन्सीमार्फत चक्क अभिनेत्रीला सुपरवायझर म्हणून काम देण्यात आलंय. मात्र, केवळ लस घेण्यासाठी हे काम देण्यात आलं असून अशा किती जणांना अशी नियुक्ती देण्यात आली आहे, याच्या चौकशीची मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केलीय. याच एजन्सीच्या माध्यमातून ग्लोबल हॉस्पीटलमध्ये मोठा घोळ काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता, त्यासंदर्भात काहीजणांना अटक झाली. त्यामुळे या कोविड सेंटरमधील आरोग्य सेवकांच्या नेमणूकांमध्येही मोठा घोळ समोर येऊ शकतो. त्यामुळे, आयुक्तांनी ताबडतोब या घटनेची सखोल चौकशी करावी, असेही डावखरे यांनी म्हटले आहे.   

लशींचा अल्प प्रमाणात पुरवठा

मागील जवळ जवळ एक महिन्यापासून ठाण्यात लसीकरणाची मोहीम संथ गतीने सुरु आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्याची मागणी करुनही ती पूर्ण होत नाही. लसींचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने लसीकरण वेगाने करता येत नसल्याचे महापालिका प्रशासन आणि महापौर नरेश म्हस्के हे सांगत आहेत. लसींचा साठा मिळावा यासाठी भाजप प्रणित केंद्र सरकारवर टिका देखील केली जात आहे. शहरात लसीकरण वेगाने व्हावे या उद्देशाने महापालिकेने ५२ केंद्रावर लसीकरण सुरु केले होते. परंतु लसींचा साठा नसल्याने शहरातील १२ ते १५ केंद्रावरच लसीकरण मोहीम सुरु आहे. त्यातही दिवसाला कोणत्या केंद्रावर कीती लसींचा साठा शिल्लक आहे, या पद्धतीने तेवढय़ाच सर्वसामान्य नागरीकांना लस दिल्या जात आहेत. उर्वरीत नागरीकांना घरी पाठविले जात आहे. त्यातही लसींचा साठा पुरेसा नसल्याने 

१८ ते ४४ लसीकरण बंद

राज्य शासनाकडून १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण थांबविण्यात आले आहे. असे असतांना नियमबाह्य पध्दतीने लसीकरण सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण बंद असतांनाही सध्या पार्कीग प्लाझा येथे एका तरुण महिला सेलिब्रेटीन लस घेतल्याची माहिती समोर आली आहे. तिनेच आपण लस घेतल्याचे फोटो सोशल मिडियावर टाकले आहेत. विशेष म्हणजे ती पार्कीग प्लाझा कोवीड सेंटरमध्ये सुपरवायझर या पदावर कार्यरत असल्याचे ओळखपत्र  देखील आता समोर आले आहे. याचाच आधार घेत तिने लसीकरण करुन घेतल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ग्लोबल हॉस्पीटलचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेकडून हे ओळखपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ती या ठिकाणी केव्हा पासून कामाला आहे, तिला या कामाची काय गरज पडली असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन दोषी असलेल्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी देखील भाजपच्यावतीने करण्यात आली आहे.


नियमबाह्य पध्दतीने लस दिली जात असेल तर सर्वसामान्यांसाठी लस का उपलब्ध करुन दिली जात नाही. असा सवाल भाजपच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. "सर्वसामान्य जनता उपाशी आणि सेलिब्रेटी तुपाशी," असाच काहीसा हा प्रकार असल्याचा आरोप भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला आहे. त्यातही तिची पोस्ट पाहून शनिवारी या वयोगटातील असंख्य तरुणांनी पार्कीग प्लाझा येथे लस घेण्यासाठी गर्दी केली होती. परंतु त्यांना मात्र लस दिली गेली नाही. महापालिकेची ही कोणती पद्धत आहे. असा सवालही डुंबरे यांनी उपस्थित केला आहे. नियमबाह्य पध्दतीने सुरु असलेले लसीकरण तत्काळ थांबविण्यात यावे अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. त्यातही सातत्याने सत्ताधाऱ्यांकडून असे प्रकार घडत असून तरी देखील ते चूक मान्य करण्यास तयार नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

इंस्टाग्राम आणि ट्विटरवर टाकली पोस्ट 

संबंधित सेलिब्रेटीने लस घेतल्यानंतर स्वतःच इन्स्ट्राग्राम आणि ट्विटरवर लस घेतल्याची पोस्ट टाकली. त्यानंतर तिची पोस्ट पाहून शनिवारी या वयोगटातील असंख्य तरुणांनी पार्कीग प्लाझा येथे लस घेण्यासाठी गर्दी केली होती. परंतु, त्यांना मात्र लस दिली गेली नाही. सोशल मिडियावर टिका झाल्यानंतर तिने हे फोटो सोशल मिडियावरुन काढल्याचेही दिसून आले आहे.  
 

Web Title: Actress mira chopra at Covid Hospital of thane, inquire into the big mess, niranjan davkhare deamdn probe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.