शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीत दाखल १८ काँग्रेस नगरसेवकांवर कारवाई होणारच; प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी फटकारलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 23:23 IST

नाना पटोले : निवडणुका स्वबळावर लढवण्याचा पुनरुच्चार

भिवंडी : महापौर निवडणुकीत काँग्रेसविरोधी भूमिका घेत कोणार्कला साथ देणाऱ्या व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झालेल्या अठरा नगरसेवकांवर कारवाई होणारच, अशी ग्वाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी भिवंडीतील काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर दिली. त्यामुळे राष्ट्रवादीत दाखल झालेल्या अठरा नगरसेवकांच्या मानेवर निलंबनाची टांगती तलवार कायम आहे. मनपा मुख्यालयासमोर असलेल्या भिवंडी शहर जिल्हा काँग्रेस पक्ष कार्यालय व स्व. राजीव गांधी चौक नूतनीकरण कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी प्रदेशाध्यक्ष पटोले शुक्रवारी सायंकाळी भिवंडीत आले होते. यावेळी ते बोलत होते.  

कार्यालय हे कार्यकर्त्यांचे शक्तिकेंद्र आहे. त्यामुळे पक्ष कार्यालयात समस्या घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांचे मत ऐकून त्याचे निवारण करणे गरजेचे असून, पक्षाची शिस्त पाळणे हे सर्वांचे कर्तव्य आहे, असे पटोले यांनी यावेळी सांगितले. पक्ष मोठा आहे, व्यक्ती नाही, हे धोरण सर्वांनी मनावर बिंबवणे गरजेचे आहे. यापुढे पक्षविरोधी कृती करणाऱ्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींविरोधात शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात येईल, असा इशाराही पटोले यांनी दिला.

भिवंडीत काँग्रेस पक्षवाढीसंदर्भात नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची बैठक पटोले यांनी घेतली. यावेळी माजी मंत्री अरीफ नसीम खान, शहरध्यक्ष रशीद ताहीर मोमीन, दयानंद चोरघे, तालुकाध्यक्ष राकेश पाटील, माजी महापौर जावेद दळवी, प्रदेश सचिव प्रदीप रांका, प्रदेश सरचिटणीस तारिक फारुकी, नगरसेविका रिषिका रांका, मुख्तार खान आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

राज्यात सत्ता असूनसुद्धा पक्ष कार्यकर्त्यांची कामे होत नसल्याची खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. आगामी काळात जिल्हास्तरावर पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसाठी मंत्र्यांचे जनता दरबार आयोजित करण्यात येतील, अशी माहिती पटोले यांनी दिली. आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याच्या दृष्टिकोनातून चाचपणी सुरू असून, त्यासाठी राज्यात काँग्रेस पक्ष बळकट करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपले मतभेद विसरून एकत्र येणे गरजेचे आहे. भिवंडीमध्ये अध्यक्षपदावरून वाद सुरू असल्याने तो मिटवण्यासाठी लवकरच दोन कार्याध्यक्ष नियुक्त करण्याचे आश्वासन बैठकीत दिले. गटबाजी खपवून घेणार नाही, पक्षविरोधी कारवाई व ध्येयधोरणाचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही पटोले यांनी दिला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोले