शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरमधील आंदोलकांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा: ३०० जणांवर गुन्हे दाखल; २६ जण अटकेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 12:42 IST

पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत २६ आंदोलकांना अटक केली असून तब्बल ३०० आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

Badlapur School Case ( Marathi News ) : बदलापूर शहरातील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर काल शहरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. विद्यार्थ्यांच्या पालकांसह शहरातील नागरिकांनी एकत्र येत आधी शाळेच्या प्रवेशद्वारावर आणि नंतर बदलापूर रेल्वे स्थानकावर आक्रमक आंदोलन केलं. आंदोलक थेट रेल्वे रुळावर उतरल्याने मंगळवारी मध्य रेल्वेवरील वाहतूक ठप्प झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत २६ आंदोलकांना अटक केली असून तब्बल ३०० आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

बदलापूर शहरातील आदर्श महाविद्यालयातील शिशुवर्गात शिकणाऱ्या चार वर्षाच्या दोन मुलींवर साहेतील सफाई कामगाराने ११ आणि १२ ऑगस्टला अत्याचार केल्याचा आरोप आहे. या अत्याचारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. एवढेच नव्हे, तर पीडित मुलीच्या आईला पोलीस ठाण्याच्या परिसरारात १२ तास उभे करुन ठेवण्यात आले होते. त्यामुळे बदलापूरकर संतप्त झाले आणि तीव्र आंदोलन छेडण्यात आले. शाळेत तोडफोड केल्यानंतर काही आंदोलकांनी आपला मोर्चा बदलापूर रेल्वे स्थानकाकडे वळवला, १० वाजता बदलापूर रेल्वे स्थानकातील रेल्वे वाहतूक आंदोलकांनी रोखली. परिणामी, अंबरनाथ स्थानकापुढील कर्जत, खोपोलीकडील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. एकीकडे शाळेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरु होते, तर दुसरीकडे रेल रोको सुरू झाल्यामुळे पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली. लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी आदोलकांशी चर्चा केली. तासभराच्या चर्चेनंतरही आंदोलन मागे घेतले जात नसल्याने पोलिसांनी दुपारी एकच्या सुमारास लाठीमार केला. यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगड भिरकावले.

दरम्यान, बदलापूर रेल्वेस्थानकात आंदोलन करणाऱ्या २६ जणांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्यात आठ महिलांचा समावेश आहे. तसेच ३०० अनोळखी व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेजद्वारे त्यांची ओळख पटवण्यात येत असल्याचे कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांटे यांनी 'लोकमत'ला सांगितले.

५० लोकल फेऱ्याही केल्या रद्द, २४ मेल-एक्स्प्रेस वळवल्या बदलापूर ते कर्जत-खोपोली अपडाऊन मार्गावरील ५० हून अधिक लोकल रद्द करण्यात आल्या. तर २४ मेल-एक्सप्रेस ठाणे, दिवा, पनवेल मार्गे वळवल्या. मंगळवारी सकाळी ९:३० पासून सर्व गाड्या खोळंबल्या, संध्या. ५ वाजेपर्यंत १२ मेल/ एक्सप्रेस वळवल्या. कल्याण ते कर्जतदरम्यान ५५ बस चालवण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. कोयना एक्स्प्रेस बदलापूर ते कल्याण व नंतर दिवा-पनवेल मार्गे कर्जतकडे पाठवली. 

टॅग्स :badlapurबदलापूरCrime Newsगुन्हेगारीSchoolशाळाsexual harassmentलैंगिक छळ