बेकायदेशीर गॅस साठ्यावर कारवाई; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

By सुरेश लोखंडे | Updated: April 1, 2026 22:13 IST2026-04-01T22:12:36+5:302026-04-01T22:13:41+5:30

तब्बल १३ लाख ९१ हजार ३२२ रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे, येथील शिधावाटप विभागाच्या फ परिमंडळ चे उपनियंत्रक प्रशांत काळे यांनी लोकमतला सांगितले.    

Action taken against illegal gas storage; Goods worth Rs 14 lakh seized | बेकायदेशीर गॅस साठ्यावर कारवाई; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

बेकायदेशीर गॅस साठ्यावर कारवाई; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

ठाणे : सध्या सर्वत्र स्वयंपाकाच्या गँसचा तुटवडा भासत आहेत. त्यास अनुसरून गॅस सिलिंडरचा अनधिकृत साठा करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार  वाशीतील सेक्टर ११ परिसरात बेकायदेशीर गॅस साठ्याचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. भरारी पथकाने छापा टाकत १२३ गॅस सिलेंडर आणि चार टेम्पो जप्त केले.

तब्बल १३ लाख ९१ हजार ३२२ रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे, येथील शिधावाटप विभागाच्या फ परिमंडळ चे उपनियंत्रक प्रशांत काळे यांनी लोकमतला सांगितले. शिधावाटप विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या या धाडीत शासनाच्या नियमांचे उल्लंघन करत गॅस सिलिंडर विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे आढळले. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू आहे. ठाणे येथील उपनियंत्रक शिधावाटप कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी भरारी पथकाने वाशी विभागात ही मोठी कारवाई केली. सेक्टर ११ मधील साईबाबा आर्केड इमारतीत ‘राईट कनेक्शन’ या नॉन-डोमेस्टिक गॅस एजन्सीकडून नियमबाह्य साठा केला जात असल्याची खात्रीशीर माहिती प्रशासनाला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी छापा टाकला असता, इमारतीबाहेर उभ्या असलेल्या बंद वाहनांमध्ये भरलेले आणि रिकामे गॅस सिलेंडर साठवलेले आढळून आले. तसेच शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून व्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईदरम्यान चार टेम्पोमधील आणि कार्यालयातील एकूण १२३ सिलेंडर जप्त करण्यात आले. यामध्ये ५५ भरलेले व ६८ रिकामे सिलेंडर असल्याची माहिती देण्यात आली. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे १३ लाख ९१ हजार ३२२ रुपये इतकी आहे. या प्रकरणी दोन आरोपींना वाशी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांच्यावर जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

Web Title : अवैध गैस भंडार पर कार्रवाई: ₹14 लाख का माल जब्त

Web Summary : वाशी में अवैध गैस सिलेंडर भंडारण पर छापा, ₹14 लाख के 123 सिलेंडर और चार टेम्पो जब्त। गैस सिलेंडर की बिक्री और भंडारण नियमों के उल्लंघन में दो गिरफ्तार। एक गैर-घरेलू गैस एजेंसी में अनधिकृत गतिविधि का खुलासा।

Web Title : Crackdown on Illegal Gas Stockpile: ₹1.4 Million Worth Seized

Web Summary : Authorities in Vashi busted an illegal gas cylinder storage operation, seizing 123 cylinders and four tempos worth ₹1.4 million. Two individuals were arrested for violating regulations related to gas cylinder sales and storage. The raid exposed unauthorized activity at a non-domestic gas agency.