उल्हासनगरात अवैध बांधकामावर कारवाई; १२ खोल्याचे अवैध बांधकामाची तक्रार
By सदानंद नाईक | Updated: March 24, 2025 20:30 IST2025-03-24T20:28:49+5:302025-03-24T20:30:17+5:30
उल्हासनगर पूर्वेतील तानाजीनगर मध्ये उभे राहिलेल्या १२ खोल्याचे अवैध बांधकामाची तक्रार आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्याकडे आली होती.

उल्हासनगरात अवैध बांधकामावर कारवाई; १२ खोल्याचे अवैध बांधकामाची तक्रार
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-५, वीर तानाजीनगर मधील १२ खोल्याचे अवैध बांधकाम महापालिका अतिक्रमण विभागाने जामीनदोस्त केले. असी कारवाई सुरु राहण्याचे संकेत सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिले आहे.
उल्हासनगर पूर्वेतील तानाजीनगर मध्ये उभे राहिलेल्या १२ खोल्याचे अवैध बांधकामाची तक्रार आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्याकडे आली होती. आयुक्तांच्या आदेशाने सहायक आयुक्त व अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांच्या पथकाने सोमवारी दुपारी पोलीस संरक्षणात पाडकाम कारवाई करण्यात आली.
शहरातील इतर अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई संकेत गणेश शिंपी यांनी दिली आहे. सरकारी खुल्या जागा, सार्वजनिक शौचालय आदी ठिकाणी बनावट बांधकाम परवाना फलक लावून अवैध बांधकाम करीत असल्याची चर्चा शहरांत होत आहे.