सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्या चार महिलांवर कारवाई

By जितेंद्र कालेकर | Updated: January 4, 2024 21:10 IST2024-01-04T21:09:44+5:302024-01-04T21:10:17+5:30

नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा : मुंबई ठाण्यातील महिलांचा समावेश

Action taken against four women who committed obscenities in public places | सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्या चार महिलांवर कारवाई

सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्या चार महिलांवर कारवाई

ठाणे : मासुंदा तलाव परिसरातील अहिल्यादेवी पुतळ्याजवळील फुटपाथवर अश्लील चाळे करीत ये-जा करणाऱ्यांचे लक्ष विचलित करणाऱ्या २५ ते ३२ वयोगटातील चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी गुरुवारी दिली. त्याच्याविरुद्ध कलम २९४ नुसार कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.

मध्यवर्ती भागात जांभळी नाक्यासमोरील मासुंदा तलाव भागात काही महिला अश्लील वर्तन करीत असल्याची माहिती नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे ३ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता या महिलांना ताब्यात घेतले. यातील दोघी मुंबईच्या तर अन्य दाेघी ठाण्याच्या सावरकरनगर भागातील रहिवासी आहेत.

Web Title: Action taken against four women who committed obscenities in public places