लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: अत्यावश्यक कारणाशिवाय वाहने घेऊन बाहेर पडणाºया एक हजार २११ वाहन चालकांविरुद्ध कलम १७९ नुसार ठाणे शहर वाहतूक शाखेने कारवाई केली. तर गेल्या २४ तासांमध्ये १८१ वाहने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये सर्वाधिक ९७ रिक्षा चालकांचा समावेश आहे.राज्य शासनाने १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजल्यापासून संचारबंदी लागू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलिसांनीही कलम १८८ तसेच १७९ चा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात जागोगागी नाकाबंदी केली आहे. ठाणे शहर पोलिसांच्या १८ युनिटच्या पथकांनी १४ एप्रिलच्या रात्रीपासून ते १५ एप्रिल सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य रस्त्यांसह नाक्या नाक्यांवर कारवाई केली. यात रिक्षांमधून दोनपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणारे रिक्षा चालक, दुचाकीवरुन सर्रास विनाकारण ट्रीपल सीट जाणारे आणि मोटारकारमधून जातांना कोरोनाचे नियम न पाळणाºयांविरुद्ध ही कारवाई केल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली. कलम २०७ अंतर्गत संपूर्ण आयुक्तालयाच्या क्षेत्रात ७२ दुचाकी ९७ रिक्षा चालकांवर तर १२ मोटारकार चालकांवर कारवाई झाली.* सर्वाधिक कारवाई कोनगावात-कोरोनाचे नियय तोडणाºया सर्वाधिक १३६ वाहन चालकांवर कोनगाव युनिटने कारवाई केली. त्यापाठोपाठ कोपरीमध्ये १३२, भिवंडीत ११५, मुंब्रा ११० तर नारपोलीमध्ये १०० वाहन चालकांवर कारवाई झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोनाचे नियम धुडकविणाऱ्या १३९२ वाहन चालकांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 00:52 IST
अत्यावश्यक कारणाशिवाय वाहने घेऊन बाहेर पडणाºया एक हजार २११ वाहन चालकांविरुद्ध कलम १७९ नुसार ठाणे शहर वाहतूक शाखेने कारवाई केली. तर गेल्या २४ तासांमध्ये १८१ वाहने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोनाचे नियम धुडकविणाऱ्या १३९२ वाहन चालकांवर कारवाई
ठळक मुद्दे १८१ वाहने केली जप्तवाहतूक शाखेने उगारला कारवाईचा बडगा