अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापावर पॉस्को कायद्यांतर्गत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 10:36 PM2018-05-18T22:36:59+5:302018-05-18T22:36:59+5:30

Action by the POSCO law on the father of minor girls | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापावर पॉस्को कायद्यांतर्गत कारवाई

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापावर पॉस्को कायद्यांतर्गत कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देआपल्याच घरांत अल्पवयीन मुलीवर अत्याचारआई वेगळी रहात असल्याने बापाने उचलला फायदाबापावर बलात्कार व पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

भिवंडी : गेल्या महिन्यापासून आपल्याच घरांत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या बापा विरोधात मुलीच्या आईने पोलीसांत तक्रार केली असता पोलीसांनी अत्याचारी बापावर पॉस्को कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
शकील अहमद अन्सारी(४१) असे बापाचे नांव असून तो फातीया नगरमध्ये फातीया मजीदजवळ रहात आहे.तर त्याची पत्नी अबीदा शकील अन्सारी(३५) ही फैय्याद बिल्डींग,गैबीनगर येथे आपल्या आईवडीला बरोबर रहात आहे.दोघे वेगवेगळे रहात असल्याचा फायदा उचलीत शकीलने आपल्या घरांत रहाणा-या १३ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यास सुरूवात केली.गेल्या महिन्यापासून तिच्यावर अत्याचार सुरू होता. काल गुरूवार रोजी आपल्या आईकडे पोहोचल्यानंतर तीने ही हकीकत सांगीतली.त्यावरून अबीदा अन्सारी हिने शांतीगनर पोलीस ठाण्यात आपला पती शकील अहमद अन्सारी याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलीसांनी शकीलवर बलात्कार कायद्यासह पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.शहरात नवीन कायद्यानुसार ही पहिलीच कारवाई असल्याने सर्वांचे लक्ष या कारवाईकडे लागले आहे.

Web Title: Action by the POSCO law on the father of minor girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.