कल्याण डोंबिवलीतील 1686 बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई, अप्पर पोलिस आयुक्त प्रताप दिघावकर यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 06:23 PM2018-10-20T18:23:47+5:302018-10-20T18:24:08+5:30

वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावित असताना कल्याण रेल्वे स्थानक परिसरात महिला पोलिसाला रिक्षा चालकाने फरफटत नेले होते. ही घटना 9 ऑक्टोबर रोजी घडली होती.

Action against 1686 unidentified rickshaw driver in Kalyan, Dombivli | कल्याण डोंबिवलीतील 1686 बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई, अप्पर पोलिस आयुक्त प्रताप दिघावकर यांची माहिती

कल्याण डोंबिवलीतील 1686 बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई, अप्पर पोलिस आयुक्त प्रताप दिघावकर यांची माहिती

Next

कल्याण - वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावित असताना कल्याण रेल्वे स्थानक परिसरात महिला पोलिसाला रिक्षा चालकाने फरफटत नेले होते. ही घटना 9 ऑक्टोबर रोजी घडली होती. या घटनेपश्चात वाहतूक पोलिस, आरटीओ आणि वाहतूक नियंत्रण पोलिसांनी रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाईचा फास आवळला. 12 ऑक्टोबरपासून बेशिस्त रिक्षा चालकांच्या विरोधात धडक कारवाई सुरु केली. आत्तार्पयत 1 हजार 686 रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई केली आहे असल्याची माहिती अप्पर पोलिस आयुक्त डॉ. प्रताप दिघावकर यांनी दिली आहे. 
    बेशिस्त रिक्षा चालकांच्या विरोधात ज्येष्ठ नागरीकांसह, अन्य प्रवाशांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अनेकदा प्रवासी भाडे नाकारले जाते. उद्धट वर्तन केले जाते. बेशिस्त वर्तन करुन प्रवाशाना नाहक त्रस दिला जातो. वेठिस धरले जाते. हे सगळे प्रकार घडत असताना त्याच पाश्र्वभूमीवर महिला पोलिसाला फरफटत नेण्याची घटना घडली. या घटनेनंतर धडक मोहिम सुरु झाली. कल्याण डोंबिवलीसह आरटीओ परिक्षेत्रतील अन्य शहरातही पोलिसांनी बेशिस्त रिक्षा चालकांच्या विरोधात मोहिम सुरु केली. 12 ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या या कारवाई मोहिमेमध्ये आत्तार्पयत 1 हजार 686 रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई केली आहे. यापूढेही ही कारवाई अधिक गतीमान केली जाईल. तीव्रतेने राबविली जाईल. बेशिस्त रिक्षा चालकाचे परमीट, बॅच जप्त करुन रिक्षाही जप्त केली जाईल असे दिघावकर यांनी सांगितले. 
    बेशिस्त रिक्षा चालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. गेल्या आठ दिवसात कारवाईचा आकडा 1 हजार 686 इतका झाला आहे. कारवाईत सातत्य ठेवले जाणार आहे. कारवाईत आरटीओ अधिकारी संजय ससाणो यांनी अधिक पुढाकार घेतला आहे. 
चौकट-कल्याण स्टेशन परिसरात बेशिस्त सुरुच
कारवाईची जोरदार सुरु असली तरी आजही कल्याण स्टेशन परिसरात दिपक हॉटेल परिसर, बस डेपो या ठिकाणावरुन रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभी करुन बेकायदेशीर रित्या भाडे भरले जाते. त्यामुळे स्टॅण्डमधील रिक्षा चालकाना प्रवाशी मिळत नाही. साईड भाडे मारणा:या रिक्षा चालकामुळे स्टेशन परिसरातील बस स्टॅण्डवर बस उभी करण्यास परिवहनच्या बस चालकाना जागा नसते. त्यामुळे त्यांच्याकडून आडवी तिडवी बस लावली जाते. या सगळ्य़ा प्रकारामुळे वाहतूक कोंडीत भरच पडते. 
 

Web Title: Action against 1686 unidentified rickshaw driver in Kalyan, Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.