अभिनेत्रीच्या कुटुंबावर फसवणुकीचा गुन्हा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 06:36 IST2017-09-11T06:36:05+5:302017-09-11T06:36:05+5:30

छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या लोकप्रिय मालिकेतील मराठी अभिनेत्रीच्या काकांना ठाणे पोलिसांनी शनिवारी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली. तिचे वडील आणि आणखी एक काकाही या प्रकरणात आरोपी आहेत.

 An act of cheating on the actress's family | अभिनेत्रीच्या कुटुंबावर फसवणुकीचा गुन्हा  

अभिनेत्रीच्या कुटुंबावर फसवणुकीचा गुन्हा  

ठाणे : छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या लोकप्रिय मालिकेतील मराठी अभिनेत्रीच्या काकांना ठाणे पोलिसांनी शनिवारी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली. तिचे वडील आणि आणखी एक काकाही या प्रकरणात आरोपी आहेत. आरोपी आणि अभिनेत्रीच्या नात्यांबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
कांदिवलीच्या व्यावसायिकाच्या तक्रारीवरून वागळे इस्टेट पोलिसांनी ही कारवाई केली. परेश मिश्रा यांना टिपटॉप प्लाझाजवळ असलेला एक व्यावसायिक गाळा भाड्याने हवा होता. त्यासाठी त्यांनी दोन वर्षांपूर्वी मराठी अभिनेत्रीचे वडील दिलीप विश्वनाथ दुर्गुळे, काका गणेश विश्वनाथ दुर्गुळे आणि रवीकुमार विश्वनाथ दुर्गुळे यांच्याशी सौदा केला. त्यापोटी रोख, आरटीजीएस आणि धनादेशाच्या माध्यमातून आरोपींना ४२ लाख रुपये दिले. मात्र, त्यांनी मिश्रा यांना गाळा भाड्याने दिला नाही. वारंवार टाळाटाळ होत असल्याने मिश्रा यांनी सहा महिन्यांपूर्वी या प्रकरणाची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाºयांकडे केली. चौकशीअंती १७ आॅगस्टला ठाण्यातील मनोरुग्णालयानजीकच्या ओसवाल सोसायटीचे रहिवासी दिलीप विश्वनाथ दुर्गुळे, गणेश विश्वनाथ दुर्गुळे आणि रवीकुमार विश्वनाथ दुर्गुळे यांच्याविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शनिवारी याप्रकरणी अभिनेत्रीचे काका रवीकुमार विश्वनाथ दुर्गुळे यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

Web Title:  An act of cheating on the actress's family

टॅग्स :Crimeगुन्हा