शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

दोन वर्षांत तीन कोटींचे अमली पदार्थ हस्तगत; १५ गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 23:51 IST

दुष्परिणाम सांगण्यासाठी पथनाट्याचे आयोजन

जितेंद्र कालेकर ठाणे : ठाणे ग्रामीण भागात दोन वर्षांत पोलिसांनी तीन कोटी १२ लाख नऊ हजार ७४० रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत केले आहेत. याशिवाय, विद्यार्थी अमली पदार्थांच्या आहारी जाऊ नयेत म्हणून शाळा-महाविद्यालयांमधून जनजागृतीही करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी, तसेच शाळा-महाविद्यालयांच्या आवारात कोणीही त्याचे सेवन करू नये, यासाठी ठाणे ग्रामीणच्या विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी व्यापक मोहीम राबविली. याच पार्श्वभूमीवर २०१८ आणि २०१९ या दोन वर्षांमध्ये नवघर पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विक्रीचे १५ गुन्हे दाखल झाले आहेत. अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या ३२ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये दोन हजार ६८९ ग्रॅम गांजा, नऊ ग्रॅम मॅफेड्रिन, दोन किलो चरस आणि २५ किलो इफेड्रिन असा तीन कोटी १२ लाख नऊ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. भार्इंदर पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विक्रीचे चार गुन्हे आणि अमली पदार्थ सेवनाचे २८ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये एक हजार ४६७ ग्रॅम गांजा, दोन किलो ४४० ग्रॅम वजनाचा मार्फीन, असा नऊ लाख ९५ हजार ४३५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याचप्रमाणे उत्तन सागरी पोलिसांनी अमली पदार्थ विक्रीचे पाच आणि सेवनाचे सहा गुन्हे दाखल केले. यात २९ ग्रॅम वजनाचा १६ हजारांचा गांजा जप्त केला आहे.कारवाईबरोबर जनजागृतीहीअमली पदार्थांची तस्करी तसेच त्यांचे सेवन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईबरोबरच त्याच्या सेवनाने आरोग्यावर होणाºया परिणामांबाबत पोलिसांनी मीरा-भार्इंदर परिसरातील शाळांमध्ये जनजागृतीची मोहीम राबविली. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रभातफेºयांचेही आयोजन केले होते. याशिवाय, मोक्याच्या ठिकाणी पथनाट्य सादर करून जनजागृती केली. तसेच व्हॉटसअ‍ॅप गृपद्वारे अमली पदार्थविक्री करणाºयांची माहिती घेऊन ती पोलिसांना कळविण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे.गेल्या दोन वर्षांमध्ये तीन कोटी १२ लाखांचा अमली पदार्थ पोलिसांच्या विविध पथकांनी जप्त केला. तरुण पिढीवर कशा प्रकारे अमली पदार्थांचे आघात होत आहेत, त्यांचे आरोग्य कसे ढासळते, याचीही जागृती केल्याने त्याचा चांगला परिणाम जाणवला. ही मोहीम यापुढेही राबविली जाणार आहे. - डॉ. शिवाजी राठोड, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण

टॅग्स :Drugsअमली पदार्थPoliceपोलिस