शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

एसीपी निपुंगेंना होणार कोणत्याही क्षणी अटक, महिला पोलिस आत्महत्या प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 10:55 PM

ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ‘नॉट रिचेबल’ झालेल्या सहायक पोलीस आयुक्त एस.बी. निपुंगे यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते.

 - जितेंद्र कालेकर ठाणे, दि. २२ - ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ‘नॉट रिचेबल’ झालेल्या सहायक पोलीस आयुक्त एस.बी. निपुंगे यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते. त्यांचा अटकपूर्व अंतरिम जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही ते स्वत:हून आयुक्तालयात हजर न झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली.निपुंगे यांनी आपल्या कनिष्ठ महिला कर्मचारी सुभद्रा हिच्याबरोबर तब्बल ११० वेळा फोनवरून संपर्क साधल्याची बाब गुरुवारी सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. याच कारणास्तव त्यांचा मोबाइल जप्त करण्याची परवानगीही पोलिसांनी मागितली आहे. त्यांच्या अटकपूर्व जामिनावर आता २५ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मुळात, निपुंगे यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला असल्याने सोमवारच्या सुनावणीपूर्वीदेखील त्यांना अटक होण्याची शक्यता असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सांगितले. या वृत्ताला तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांनीही दुजोरा दिला. त्यामुळे सोमवारी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाला, तरच त्यांना दिलासा मिळणार आहे. अन्यथा, त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतरही त्यांनी चौकशी अधिकारी किंवा मुख्यालयाचे उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे संपर्क साधलेला नाही. त्यामुळे विनापरवानगी गेल्या १५ दिवसांपासून गैरहजर राहिलेल्या निपुंगे याच्याविरुद्ध कारवाई करण्याबाबतचा अहवालही तपास अधिका-यांकडून पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे तसेच राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे त्या अहवालावरही येत्या काही दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे अटक आणि दुसरीकडे प्रशासकीय कारवाई, अशा दोन्ही बाजूंची टांगती तलवार निपुंगे यांच्यावर असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाºयाने दिली.........................................

 

 

 

 

- जितेंद्र कालेकर ठाणे, दि. २२ -ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ‘नॉट रिचेबल’ झालेल्या सहायक पोलीस आयुक्त एस.बी. निपुंगे यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते. त्यांचा अटकपूर्व अंतरिम जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही ते स्वत:हून आयुक्तालयात हजर न झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली.निपुंगे यांनी आपल्या कनिष्ठ महिला कर्मचारी सुभद्रा हिच्याबरोबर तब्बल ११० वेळा फोनवरून संपर्क साधल्याची बाब गुरुवारी सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. याच कारणास्तव त्यांचा मोबाइल जप्त करण्याची परवानगीही पोलिसांनी मागितली आहे. त्यांच्या अटकपूर्व जामिनावर आता २५ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मुळात, निपुंगे यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला असल्याने सोमवारच्या सुनावणीपूर्वीदेखील त्यांना अटक होण्याची शक्यता असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सांगितले. या वृत्ताला तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांनीही दुजोरा दिला. त्यामुळे सोमवारी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाला, तरच त्यांना दिलासा मिळणार आहे. अन्यथा, त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतरही त्यांनी चौकशी अधिकारी किंवा मुख्यालयाचे उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे संपर्क साधलेला नाही. त्यामुळे विनापरवानगी गेल्या १५ दिवसांपासून गैरहजर राहिलेल्या निपुंगे याच्याविरुद्ध कारवाई करण्याबाबतचा अहवालही तपास अधिकाºयांकडून पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे तसेच राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे त्या अहवालावरही येत्या काही दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे अटक आणि दुसरीकडे प्रशासकीय कारवाई, अशा दोन्ही बाजूंची टांगती तलवार निपुंगे यांच्यावर असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिका-याने दिली. 

 

 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस