वागळे इस्टेटमधील किराणा दुकानातून चक्क देशी-विदेशी दारूची विक्र ी: आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 22:42 IST2021-03-05T22:39:11+5:302021-03-05T22:42:32+5:30
चक्क एका जनरल स्टोअर्स मधून देशी विदेशी मद्याची बेकायदेशीरपणे विक्र ी करणाऱ्या सईद नासिर शेख (३२, आंबेवाडी, वागळे स्टेट, ठाणे) या दुकान मालकास वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केल्याची माहिती शुक्रवारी दिली.

दुकान मालकास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: चक्क एका जनरल स्टोअर्स मधून देशी विदेशी मद्याची बेकायदेशीरपणे विक्र ी करणाऱ्या सईद नासिर शेख (३२, आंबेवाडी, वागळे स्टेट, ठाणे) या दुकान मालकास वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केल्याची माहिती शुक्रवारी दिली. त्याच्याकडून २८ हजारांचे मद्य जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील वागळे स्टेट परिसरात असलेल्या आंबेवाडी भागात एका जनरल स्टोअर्स मधून मद्याची विक्र ी होत असल्याची माहिती वागळे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास याठिकाणी छापा मारला. यावेळी दुकानात ४२९ देशी, ११८ विदेशी मद्याच्या तर ३३ बियरच्या बाटल्या आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या सर्व बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी वागळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सईद शेख यास अटक करण्यात आली आहे.