गतिमंद अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आराेपीस अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: June 12, 2025 22:47 IST2025-06-12T22:47:15+5:302025-06-12T22:47:31+5:30

कळवा पाेलिसांची कारवाई: अश्लील व्हिडिओचे माेबाईलमध्ये चित्रण

Accused arrested for sexually assaulting a young girl | गतिमंद अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आराेपीस अटक

गतिमंद अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आराेपीस अटक

- जितेंद्र कालेकर


लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : १३ वर्षीय गतिमंद मुलीवर अत्याचार करून तिचा अश्लील व्हिडिओ बनविणाऱ्या अद्वैत खाेत्रे (वय २३) याला अटक केल्याची माहिती कळवा पाेलिसांनी गुरुवारी दिली. त्याला १७ जूनपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेला अद्वैत आणि पीडितेचा एक अश्लील व्हिडिओ एका मुलाला माेबाईलवर आढळला. यातील पीडिता त्याच भागातील असल्याने त्याने ही माहिती कळवा पाेलिसांना दिली. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक अशाेक उतेकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पाेलिस निरीक्षक विनायक कर्डे यांच्या पथकाने या प्रकाराची पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांकडे खातरजमा केली. १० जून राेजी सकाळी ९.३० वाजता अद्वैत याने पीडितेवर त्याच्या खारेगावमधील पाखाडी येथील घरात अत्याचार केल्याची बाब समाेर आली. या अत्याचाराचे व्हिडिओ चित्रणही त्याने माेबाईलमध्ये काढले. हेच चित्रण त्याने त्याच्या एका मित्रालाही दाखविले. यातूनच हा प्रकार उघड झाला. पीडितेच्या पालकांनी याची तक्रार दाखल केल्यानंतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करून आराेपीला ११ जून राेजी अटक केल्याचे कळवा पाेलिसांनी सांगितले.

Web Title: Accused arrested for sexually assaulting a young girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.