लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन त्याद्वारे अश्लील शिवीगाळ करुन आव्हाड यांच्यासह त्यांच्या कुटूंबियांचे फोटो फेसबुकवर प्रसारित करणाºया सुनिल रायभान पवार उर्फ सुनिल राजे पवार (२८, रा. औरंगाबाद) याला औरंगाबाद येथून ठाणे गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून मोबाईलही जप्त करण्यात आला आहे.गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आव्हाड यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते तयार केल्यानंतर त्याद्वारे अश्लील तसेच शिवीगाळ असलेला मजकूर तसेच आव्हाड यांचे कौटुंबिक आणि वैयक्तिक फोटोही त्यावर प्रसारित केले होते. याप्रकरणी ८ एप्रिल २०२० रोजी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात शिवीगाळ करणे, धमकी देणे, विनयभंग तसेच माहिती व तंत्रज्ञान अधिनियमाखाली गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सायबर सेलेचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण वाघ, पोलीस नाईक अनुरोध गावित, कॉन्स्टेबल विजयअमर खरटमल, रवींद्र घोडके, गंगाधन तिर्थंकर, राजकुमार राठोड आणि सुजितकुमार तायडे आदींच्या पथकाने १८ डिसेंबर रोजी औरंगाबादक्र ांतीनगर सिडको येथून सुनिल पवार याला अटक केली. त्याला ठाणे न्यायालयाने २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. बनावट फेसबुक अकाउंट तयार करण्यासाठी तसेच गुन्हयासाठी वापरलेला मोबाईल त्याच्याकडून जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 19:23 IST
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन त्याद्वारे अश्लील ...
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करणाऱ्यास अटक
ठळक मुद्दे ठाणे सायबर सेलची कामगिरीऔरंगाबाद येथून केली अटक