शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा मोठा निर्णय; डॅमेज कंट्रोल सुरू
2
आजचे राशीभविष्य, १८ जून २०२४ : कर्कसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
महायुतीत तिसरा मित्र नको म्हणणाऱ्यांना भाजपमध्ये बळ; आकडेवारीने वाढवली अजित पवारांची डोकेदुखी!
4
लोकसभा अध्यक्षपद भाजपकडेच?; 'या' महिला नेत्याचे नाव स्पर्धेत आघाडीवर
5
...तर मी ओबीसींच्या आंदोलनात पुन्हा उतरेन; मंत्री छगन भुजबळांचा सरकारला इशारा
6
आजचा अग्रलेख: संशयकल्लोळ..!
7
गणपती स्पेशल जादा गाड्या सोडा; अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी
8
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
9
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
10
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
11
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
12
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
13
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
14
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
15
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
16
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना गती येणार, विभागीय आयुक्तांवर जबाबदारी; सहा वर्षांत ५३० कामांना मंजुरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 10:40 AM

मार्च महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सध्या सुरू असलेल्या आणि प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गांची सद्य:स्थिती आणि प्रकल्पांत येणाऱ्या अडथळ्यांबाबत चर्चा झाली होती.

नारायण जाधवठाणे : भूसंपादनासह वनखात्याच्या अडथळ्यांमुळे राज्यातून जाणाऱ्या अनेक महामार्गांचे काम रखडत चालले आहे. याबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना गती देण्यासाठी प्रत्येक प्रशासकीय विभागाच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मार्च महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सध्या सुरू असलेल्या आणि प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गांची सद्य:स्थिती आणि प्रकल्पांत येणाऱ्या अडथळ्यांबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर नितीन गडकरी यांनी एप्रिल महिन्यात पुन्हा देशातील सर्व राज्यांच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून महामार्गांच्या कामांना गती देण्यासाठी उपसमिती स्थापन करण्याची सूचना केली होती. 

त्यानुसार, राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या उपसमित्या गठीत केल्या आहेत. यात नॅशनल हायवेचे मुख्य अभियंता, महाव्यवस्थापक, विभागीय वनाधिकारी, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ, महावितरण, जीवन प्राधिकरण यांचे सर्व विभागीय मुख्य अभियंता अशा १० जणांचा समावेश आहे. उपसमित्यांचे काम आपल्या विभागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांची सद्य:स्थिती, त्यासाठी लागणारी एकूण शेतजमीन, अभयारण्यांसह वनजमिनीचे अडथळे, द्यावा लागणारा मोबदला, उच्च व लघुदाब वीजवाहिन्यांचे स्थलांतर, त्यासाठीच्या खर्चासह आपापल्या कार्यक्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गातील अडचणी व त्यावरील उपाय शोधून ते सर्व सदस्यांनी उपसमितीसमोर सादर करायचे आहेत. महाराष्ट्रातून जाणारे प्रमुख राष्ट्रीय महामार्गठाण्यासह पालघर जिल्ह्यातून जाणारा दिल्ली-बडोदरा-मुंबई महामार्ग, सुरत-सोलापूर, सोलापूर-कर्नुल, नागपूर-विजयवाडा या प्रमुख महामार्गांसह इतर मार्गांचा समावेश आहे. नितीन गडकरींनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला, तेव्हा राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची लांबी ५७०० किमी होती. ती आॅगस्ट २०२० अखेर १७,७४० किमी इतकी झाली आहे. सहा वर्षांत ५३० नवी कामे मंजूर केली असून यात १.२८ कोटींच्या ११०० किमी काँक्रिट रस्त्यांचा समावेश आहे.

टॅग्स :commissionerआयुक्तhighwayमहामार्गroad transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा