देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करणाऱ्या महिलेला शिवीगाळ; पोलीस ठाण्यात तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 23:47 IST2021-03-26T23:47:03+5:302021-03-26T23:47:27+5:30

२४ मार्च रोजी या महिलेने ही पोस्ट फेसबुकवर केली होती. त्यानंतर तिचे स्क्रीनशॉट घेऊन ती सोशल मिडियावर व्हायरल केली.

Abusing a woman who praised Devendra Fadnavis; Report to police station | देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करणाऱ्या महिलेला शिवीगाळ; पोलीस ठाण्यात तक्रार 

देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करणाऱ्या महिलेला शिवीगाळ; पोलीस ठाण्यात तक्रार 

ठाणे : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाच्या कौतुकाची पोस्ट फेसबुकवर करणाऱ्या भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याला अश्लील आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी शुक्रवारी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाईची मागणीही या महिला पदाधिकाऱ्यांसह डावखरे यांनी केली आहे.

२४ मार्च रोजी या महिलेने ही पोस्ट फेसबुकवर केली होती. त्यानंतर तिचे स्क्रीनशॉट घेऊन ती सोशल मिडियावर व्हायरल केली. गुरुवारी काही लोकांनी या महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली असून त्यांच्यावर कारवाईची मागणी भाजपने पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

Web Title: Abusing a woman who praised Devendra Fadnavis; Report to police station