शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन: पोलीस निरीक्षकाला दोन महिने कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 21:55 IST

एका महिला सहकारी कर्मचा-याबरोबर गैरवर्तन करीत तिची लैंगिक छळवणूक करणा-या कापूरबावडी पोलीस ठाण्याचा तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक मसाजी काळे याला ठाणे न्यायालयाने दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या घटनेने ठाणे वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे ठाणे न्यायालयाचा निर्णयखोटया आरोपांमुळे महिला कर्मचाऱ्याला केले होते निलंबित नऊ वर्षांनी मिळाला न्याय

ठाणे : सहकारी महिला कर्मचा-याशी गैरवर्तन केल्याबद्दल कापूरबावडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक आणि सध्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मसाजी काळे यांना ठाणे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. एच. झा यांनी सोमवारी दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.काळे हे २००९ मध्ये ठाणे आयुक्तालयात कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी एका सहकारी महिलेची लैंगिक छळवणूक केल्याची तक्रार तिने दाखल केली होती. या प्रकरणाची अंतिम सुनावणी न्या. झा यांच्या न्यायालयात झाली. आपल्याशी लगट करण्याचा प्रकार काळे यांनी केल्याची तक्रार पीडित कर्मचारी महिलेने केली होती. त्यांनी तिची अनुपस्थिती लावून तिच्याविरुद्ध पोलीस डायरीमध्ये शेराही मारला होता. घटनेच्या एक महिन्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधून तिने काळे यांच्यावर कारवाईची मागणी केली. तसेच आयुक्तालयातील अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही तिने दाद मागण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिला कोणीही दाद दिली नाही. आपल्याविरुद्ध तक्र ार करण्यात येत असल्याची माहिती मिळताच काळे यांनी तिच्याविरुद्ध पोलीस उपायुक्तांकडे रिपोर्ट पाठवला. त्यामुळे तिला एप्रिल २०११ मध्ये सेवेतून निलंबित करण्यात आले. सतत दोन वर्षे त्रास सहन केल्यावर पुन्हा निलंबनाचीही कारवाई झाल्याने या महिला पोलीस कॉन्स्टेबलने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर, याप्रकरणी चौकशीचे आदेश देत न्यायालयाने विशाखा समितीच्या अध्यक्षा व तत्कालीन पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्याकडे ही चौकशी सोपवली. करंदीकर यांनी चौकशी करुन २०१२ मध्ये ठाणे प्रथम वर्ग न्यायालयात काळे यांच्याविरुद्ध भादंविच्या ५०९ आणि विनयभंगाच्या कलम ३५४ सह आरोपपत्र दाखल केले. याबाबतची सुनावणी सुरू झाल्यानंतरही आरोपी काळे यांनी या महिलेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, खोटे आरोप करून तिचे निलंबन झाल्याची माहिती उघड झाल्यानंतर तिला पुन्हा सेवेत घेण्यात आले. काळे हे अनेक सुनावणींना गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरुद्ध न्यायालयाने अटक वॉरंट काढले होते. या सर्व बाबी सहायक सरकारी वकील रश्मी क्षीरसागर यांनी न्यायालयात मांडून जोरदार युक्तिवाद केला. आरोपीला शिक्षा करण्याची मागणी केली. मात्र, आरोपीचे वकील रवी कामत यांनी तिच्या निलंबनामुळेच ती खोटेनाटे आरोप करीत असल्याचा युक्तिवाद केला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्या. झा यांनी दि. २५ फेब्रुवारी रोजी काळे यांना दोषी ठरवत कलम ५०९ अन्वये दोन महिन्यांच्या कारावासाची तसेच १० हजारांच्या दंडाचीही शिक्षा ठोठावली. दहा हजारांमधील पाच हजार रुपये पीडित कर्मचारी महिलेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस