शिवमंदिरात श्रावणी सोमवार निमित्त अभिषेक संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 10:35 IST2020-07-27T10:35:47+5:302020-07-27T10:35:47+5:30

श्रावणी सोमवार निमित्त शहरातील विविध शंकराच्या मंदिरात देऊळ बंद असताना व्यवस्थापनातर्फे पिंडीवर दुधाचा अभिषेक, रुद्र पठण सेवा संपन्न झाली.

Abhishek on the occasion of Shravani Monday at Shiva Temple | शिवमंदिरात श्रावणी सोमवार निमित्त अभिषेक संपन्न

शिवमंदिरात श्रावणी सोमवार निमित्त अभिषेक संपन्न

डोंबिवली: श्रावणी सोमवार निमित्त शहरातील विविध शंकराच्या मंदिरात देऊळ बंद असताना व्यवस्थापनातर्फे पिंडीवर दुधाचा अभिषेक, रुद्र पठण सेवा संपन्न झाली. येथील श्री गोविदानन्द श्रीराम मंदिर, शिवमंदिर पथ येथील शिवमंदिर, पिंपलेश्वर येथील।महादेव मंदिर तसेच अन्य भागातील शिवमंदिरात दुधाचा अभिषेक।करण्यात आला.

रुद्र पठण साठी मंदिरातील पुजारी आणि व्यवस्थापनातील मोजके सेवेकरी, पदाधिकारी आदींनी फिजिकल डिस्टन्स पाळून अभिषेक, पूजा संपन्न केली. बेल, फुल वाहून पूजा करण्यात आली. श्रीसुक्त, पुरुषसुक्त पठण करण्यात आले. सकाळी मंद आवाजात महादेवाचा नामजप करण्यात आला. भक्तांनी मंडळाकडे, मंदिराकडे अभिषेक नोंदवून गोत्र सांगून पहिला श्रावणी सोमवार भक्तीभावें संपन्न केला.

Web Title: Abhishek on the occasion of Shravani Monday at Shiva Temple