Abhayavip's 9 lectures to promote 'Vision 3' in the dream of the late former President Abdul Kalam | दिवंगत माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील ‘व्हिजन २०२०’ प्रबोधनासाठी अभाविपची ९ व्याख्यान संपन्न

दिवंगत माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील ‘व्हिजन २०२०’ प्रबोधनासाठी अभाविपची ९ व्याख्यान संपन्न

डोंबिवली: स्वामी विवेकानंद आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतिचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे युवक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्या निमित्ताने गुरुवारी व्हिजन २०२० ह्या विषयावर ९ विविध महाविद्यालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले.दिवंगत माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम ह्यांनी  व्हिजन २०२० बद्दल पाहिलेले स्वप्न काय होते? याबाबतचे प्रबोधन परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये केले. 

दिवसभरात प्रगती महाविद्यालय, मंजुनाथ महाविद्यालय, वंदे मातरम् महाविद्यालय, कल्याणचे शिशू कनिष्ठ महाविद्यालय, बदलापूरचे भारत कॉलेज, उल्हासगरच्या सीएचएम महाविद्यालयात, शहापूर येथे कृषी महाविद्यालय, आणि स्व. गोपीनाथ पाटील महाविद्यालय या ९ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. कलाम यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युवकांची भूमिका काय असायला हवी, त्यासाठी विद्यार्थ्यांचे योगदान, समर्थ भारत घडवण्यासाठी विद्यार्थी दशेत काय करू शकतो आदी मुद्यांच्या आधारे प्रोव्हायडिंग अर्बन फॅसिलिटीज इन रुरल एरिया  ह्या कल्पनेअंतर्गत त्यांना अपेक्षित ग्रामीण भारताचा विकास आणि त्यासाठी आजच्या तरुणांचे योगदान इत्यादी विषयांवर मार्गदर्शन पर व्याख्यान झाले. त्यासाठी अतिष कुलकर्णी, ईशान गणपुले, भूषण धर्माधिकारी,  प्रा. मिलिंद मराठे, दत्ता गोखले, आशीर्वाद बोन्द्रे,  प्रा. अमित शर्मा, मिहिर देसाई आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

या निमित्त अन्य ठिकाणी विविध महाविद्यालयात व्याख्यान, प्रश्नमंजुषा, विवेकानंद रथ, रक्तदान शिबीर, कला क्रीडा स्पर्धा असे विविध कार्यक्रम आयोजित केले गेले. प्रदेश मंत्री प्रेरणा पवार, जिल्हा संयोजक तन्मय धर्माधिकारी, कल्याण शहरमंत्री अमोल शिंदे, शुभम शिवेकर, देवेश बाबरे, श्रेया कर्पे, दीपक शर्मा, हरी ओम शर्मा, चैताली, सिमरन दराडे, अभिषेक कठोळे, हर्षदा क्षीरसागर, प्रतीक कठोळे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले होते. सर्व महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभल्याने अभाविपच्या पदाधिका-यांनी समाधान व्यक्त केले. 

Web Title: Abhayavip's 9 lectures to promote 'Vision 3' in the dream of the late former President Abdul Kalam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.