ठाण्यात आपच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त जनतेच्या समस्यांवर पदयात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 14:41 IST2018-10-01T14:08:38+5:302018-10-01T14:41:02+5:30
महात्मा गांधी जयंती निमित्त आप पक्षाने ठाण्यामध्ये वीज बिल इंधन दरवाढ आणि महिलांची सुरक्षा, शिक्षणाचा अधिकार यासह विविध विषयांवर जनजागृती पदयात्रा आयोजित केली आहे.

ठाण्यात आपच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त जनतेच्या समस्यांवर पदयात्रा
ठाणे - महात्मा गांधी जयंती निमित्त आप पक्षाने ठाण्यामध्ये वीज बिल इंधन दरवाढ आणि महिलांची सुरक्षा, शिक्षणाचा अधिकार यासह विविध विषयांवर जनजागृती पदयात्रा आयोजित केली आहे. मोदी आणि फडणवीस सरकारने चार वर्षात गरीब आणि सामान्य जनतेच्या मूलभूत गरजा देखील पूर्ण केल्या नाही.
जीएसटीमुळे छोटा व्यापारी नाडला गेला. वीज बिलात प्रचंड वाढ, घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमध्ये वाढ, जॉबसाठी दरवर्षी 40 लाख युवकांनी नाव नोंदणी करूनही रोजगार नाही. ठाणे शहरातील आरोग्य व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मरणाला लागली आहे. 70 टक्के ठाणेकरांना हक्काचे घर नाही. तसेच नागरी सुविधा नाही. हा कोणता विकास आहे असे आम आदमी पक्ष विचारत आहे. या संदर्भात जनजागरण पदयात्रेला महात्मा गांधी यांना अभिवादन करून 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता रघुनाथ नगर ठाणे पश्चिम येथून सुरुवात होणार आहे. या पदयात्रेत आम आदमी पक्षाच्या कुमुद ताई मिश्रा सहभागी होणार आहेत.