शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘ए... लाव रे तो व्हिडीओ’ ठाण्यात नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 00:14 IST

महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांत सध्या ‘ए... लाव रे तो व्हिडीओ’, असा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश घुमत आहे.

ठाणे : महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांत सध्या ‘ए... लाव रे तो व्हिडीओ’, असा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश घुमत असून त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वक्तव्याचे व सरकारमधील उणिवांचे व्हिडीओ प्रदर्शित केले जात आहेत. मात्र, ठाणे लोकसभा मतदारसंघात राज यांचा तोच आदेश घुमण्याची शक्यता कमी असल्याचे मनसेच्या उच्चपदस्थ नेत्यांनी सांगितले. अर्थात, मनसेचे स्थानिक नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते राज यांनी ठाण्यात सभा घ्यावी, याकरिता प्रयत्नशील आहेत. परंतु, ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघांतील राष्ट्रवादीचे उमेदवार तुलनेने कमकुवत वाटत असल्याने राज उत्सुक नसल्याची चर्चा आहे. कारण, निवडणूक निकालानंतर राज यांनी जेथेजेथे सभा घेतल्या, तेथेतेथे निकाल कुणाच्या बाजूने लागले, याची चर्चा होणे स्वाभाविक असल्याने जेथे हमखास विरोधी उमेदवारांची विजयाची शक्यता आहे, तेथे पायधूळ झाडण्याचा चाणाक्षपणा राज यांनी दाखवल्याचे बोलले जाते.लोकसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार रिंगणात नाही. मात्र, केवळ नरेंद्र मोदी व अमित शहा या जोडगोळीला राजकीय क्षितिजावरून दूर करा, हा संदेश देण्याकरिता राज यांच्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा झाल्या. पार्थ पवार, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, अशा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मातब्बर व पुन्हा विजयी होण्याची दाट शक्यता असलेल्या उमेदवारांकरिता राज यांनी सभा घेतल्या आहेत. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे संघटन मजबूत आहे. तसेच ठाणे लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना ऐनवेळी गणेश नाईक यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यावर रिंगणात उतरवले आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील हेही नवखे असून ते ठाणे महापालिकेतील नगरसेवक आहेत. राज ठाकरे यांनी सभा घेताना आपल्या भाषणाचा आजूबाजूच्या किमान दोन ते तीन मतदारसंघांवर प्रभाव पडेल, असा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राज हे मुंबईत एकच सभा घेतील, अशी शक्यता आहे. राज यांनी ठाणे व पनवेल येथे जाहीर सभा घ्यावी, याकरिता मनसेचे स्थानिक नेते प्रयत्नशील आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही मुंबई, ठाण्यातील उमेदवारांकरिता एकच सभा घेणार आहेत. त्यामुळे आपणही केवळ मुंबईतच एक सभा घेऊ, असा विचार राज करतील, असे समजते. राज यांच्या पुढील सभांची यादी येत्या एकदोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, ठाणे हे त्यामध्ये नसेल, असे संकेत एका उच्चपदस्थ नेत्याने दिले. अर्थात, स्थानिक नेत्यांनी अजून आशा सोडलेली नाही. सभा घ्यावी, याकरिता ते राज यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.>राष्ट्रवादीचे नेते राज यांनी ठाण्यात सभा घ्यावी, याकरिता प्रयत्नशील आहेत; परंतु ठाणे व कल्याणमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार तुलनेने कमकुवत वाटत असल्याने राज उत्सुक नसल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणे