उल्हासनगरात चाकूचा धाक दाखवून तरुणाला मारहाण

By सदानंद नाईक | Updated: November 29, 2023 18:17 IST2023-11-29T18:16:53+5:302023-11-29T18:17:07+5:30

याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

A young man was beaten up by threatening him with a knife in Ulhasnagar | उल्हासनगरात चाकूचा धाक दाखवून तरुणाला मारहाण

उल्हासनगरात चाकूचा धाक दाखवून तरुणाला मारहाण

उल्हासनगर : कॅम्प नं-२, खेमानी आझादनगर मध्ये मंगळवारी सायंकाळी ७ वाजता सुमित यादव याने चाकूचा धाक दाखवून एका तरुणाला मारहाण केली. तसेच हवेत चाकू भिरकावून परिसरात दहशद माजविण्याचा प्रकार केला असून याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 उल्हासनगर खेमानी परिसरातील आझादनगर येथे मंगळवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान सुरज श्रीकृष्ण सिंग हे मित्रा समवेत गप्पा मारीत होते. त्यावेळी तेथे आलेल्या सुमित रामनाथ यादव याने काहीएक कारण नसतांना सुरज सिंग यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच चाकू बाहेर काढून तुझे जिंदा नही छोडता हुं असे म्हणत जिवेठार मारण्याची धमकी दिली. यावेळी चाकू हवेत भिरकावून परिसरात दहशत माजविण्याचा प्रकार केला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
 

 

Web Title: A young man was beaten up by threatening him with a knife in Ulhasnagar