उल्हासनगरमध्ये घराच्या छतावर प्लास्टिक कपडा टाकत असताना विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 17:55 IST2025-07-28T17:54:33+5:302025-07-28T17:55:46+5:30

Ulhasnagar News: वडिला सोबत घरावर प्लास्टिक कपडा टाकत असताना सोमवारी सकाळी विजेचा धक्का बसून १७ वर्षीय आयुष्य रॉय याचा मृत्यू झाला. घराच्या मिटर मध्ये बिघाडाची तक्रार देऊनही महावितरणचे कर्मचारी आले नसल्याचे घरच्यांचे म्हणणे आहे.  

A young man died of electrocution while putting plastic sheeting on the roof of his house in Ulhasnagar. | उल्हासनगरमध्ये घराच्या छतावर प्लास्टिक कपडा टाकत असताना विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू

उल्हासनगरमध्ये घराच्या छतावर प्लास्टिक कपडा टाकत असताना विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू

- सदानंद नाईक
उल्हासनगर - वडिला सोबत घरावर प्लास्टिक कपडा टाकत असताना सोमवारी सकाळी विजेचा धक्का बसून १७ वर्षीय आयुष्य रॉय याचा मृत्यू झाला. घराच्या मिटर मध्ये बिघाडाची तक्रार देऊनही महावितरणचे कर्मचारी आले नसल्याचे घरच्यांचे म्हणणे आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-२, शास्त्रीनगर धोबीघाट परिसरात रामचंद्र रॉय यांच्या घराचे छत पावसाने गळत असल्याने, प्लास्टिक कपडा टाकण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी घराच्या छतावरील उघड्या विधुत वहिनीची तसेच घर वीज मिटरची तक्रार रॉय कुटुंबाने केली होती. त्यानंतरही महावितरणचे कर्मचारी आले नाही. असे घरच्यांचे व शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. सोमवारी सकाळी घरावर प्लास्टिक कपडा टाकण्यासाठी १७ वर्षाचा आयुष्य हा वडील रामचंद्र रॉय यांनं मदत करीत होता. त्यावेळी त्याला विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. या दुर्घटनेला महावितरण विभागात जबाबदार असल्याचा आरोप रॉय कुटुंबाने केला. आयुष्य आरकेटी कॉलेज मध्ये शिकत असल्याचे बोलले जाते. त्याच्या मृत्यूने रॉय कुटुंबावर शोककळा पसरली असून अधिक तपास उल्हासनगर पोलीस करीत आहेत.

Web Title: A young man died of electrocution while putting plastic sheeting on the roof of his house in Ulhasnagar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.