भिवंडीत घराची भिंत, छत कोसळून तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 10:24 IST2024-06-30T10:23:59+5:302024-06-30T10:24:09+5:30

विमल विशेसर साह (वय ३५) असे तरुणाचे नाव आहे. नारपोली गावात राजाराम पाटील चाळ आहे. 

A young man died after the wall and roof of the house collapsed in Bhiwandi | भिवंडीत घराची भिंत, छत कोसळून तरुणाचा मृत्यू

भिवंडीत घराची भिंत, छत कोसळून तरुणाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : नारपोली गावाच्या हद्दीत चाळीतील घराची भिंत व छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. विमल विशेसर साह (वय ३५) असे तरुणाचे नाव आहे. नारपोली गावात राजाराम पाटील चाळ आहे. येथे विमल साह राहत होते. अचानक खोलीची भिंत व छत कोसळले. त्यावेळी विमल याच्या अंगावर ढिगारा पडल्याने त्या ढिगाऱ्याखाली ते दाबले. त्यात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. 

परंतु घटनेला २४ तास उलटून गेले तरीही घटनेची नोंद पालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष अथवा स्थानिक प्रभाग समिती क्रमांक चार येथे नव्हती. स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने विमलचा मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालय शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: A young man died after the wall and roof of the house collapsed in Bhiwandi