ट्रकखाली चिरडून तरुणाचा मृत्यू; ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 07:12 IST2023-03-29T07:12:19+5:302023-03-29T07:12:25+5:30
या प्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात ट्रकचालक समाधान शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रकखाली चिरडून तरुणाचा मृत्यू; ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल
उल्हासनगर : कॅम्प क्रमांक ३ फॉरवर्ड लाइन चौकाकडे पायी जाणाऱ्या सुशील केदारे याला भरधाव ट्रकने चिरडले. यात सुशील याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. २७) सायंकाळी साडेपाच वाजता घडली. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात ट्रकचालक समाधान शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगर कॅम्प क्रमांक ३ परिसरात काम करणारा सुशील अशोक केदारे (वय २६) हा सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता मध्यवर्ती रुग्णालयाकडून फॉरवर्ड लाइन चौकाकडे पायी जात होता. यावेळी रोहिदास महाराज चौक येथे भरधाव ट्रकने सुशील याला चिरडले. काही क्षणातच ही घटना घडली.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुशील याला क्रिटिकेअर रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी उत्तरीय तपासणी व शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देऊन अपघातानंतर पळून गेलेल्या ट्रकचालक समाधान शिंदे याला अटक केली. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.