चाकूचा धाक दाखवून महिलेवर सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2024 17:52 IST2024-09-15T17:52:11+5:302024-09-15T17:52:22+5:30

तुळींज दोन नराधमांविरुद्ध केला गुन्हा दाखल

A woman was gang-raped at knifepoint | चाकूचा धाक दाखवून महिलेवर सामूहिक बलात्कार

चाकूचा धाक दाखवून महिलेवर सामूहिक बलात्कार

नालासोपारा (मंगेश कराळे) :- चाकूचा धाक दाखवून ३२ वर्षीय पीडित महिलेला पाठीमागून तोंड दाबून, केस पकडून व उचलून नेऊन एका रूममध्ये दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याने नालासोपारा शहरात एकच खळबळ माजली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून तुळींज पोलिसांनी शनिवारी दोन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नालासोपाऱ्यात राहणारी ३२ वर्षीय पीडित महिला ही १० सप्टेंबरला रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास मुलाला बोलविण्यासाठी गेली होती. तेव्हा तेथे आरोपी जितेंद्र यादव उर्फ काटु हा त्यांच्या पाठीमागून येऊन महिलेच्या डोक्याचे केस पकडून एक हाताने तोंड दाबले. नंतर एका गल्लीतून खेचत एकाच्या रुममध्ये घेऊन जावून जितेंद्र व दुसरा आरोपी अवी जैसवाल उर्फ बिल्लु याने पीडित महिलेला चाकुचा धाक दाखवुन जबरदस्तीने शारीरीक संभोग केला. तसेच जर सदर प्रकार कोणास सांगितला तर जीवे ठार मारण्याची धमकी दोन्ही आरोपींनी त्यांना दिली. शेवटी शनिवारी पीडित महिलेने तुळींज पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपी विरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिलेची तक्रार आल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेचे आरोपी सोबत काही वाद असल्याची माहिती मिळाली आहे. झालेला हा प्रकार खरा आहे की खोटा आहे याचा तपास करत आरोपींचा शोध घेत आहे. - शैलेंद्र नगरकर, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे)

Web Title: A woman was gang-raped at knifepoint