ऑनलाइन पैसे कमवून देण्याच्या बहाण्याने महिलेची नऊ लाख रुपयांची फसवणूक
By नितीन पंडित | Updated: February 15, 2024 17:51 IST2024-02-15T17:50:32+5:302024-02-15T17:51:29+5:30
सीमा निलेश धुळे वय २९ वर्ष असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव असून या महिलेला ११ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान आराध्या व अमन निल अशा दोघांनी ऑनलाइन माध्यमातून पैसे कमावून देण्याचे आमिष दाखवले होते.

ऑनलाइन पैसे कमवून देण्याच्या बहाण्याने महिलेची नऊ लाख रुपयांची फसवणूक
भिवंडी : ऑनलाइन पैसे कमवून देण्याच्या बहाण्याने महिलेची नऊ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार भिवंडीत समोर आला आहे. याप्रकरणी महिलेने शांतीनगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.
सीमा निलेश धुळे वय २९ वर्ष असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव असून या महिलेला ११ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान आराध्या व अमन निल अशा दोघांनी ऑनलाइन माध्यमातून पैसे कमावून देण्याचे आमिष दाखवले होते. या आमिषाला बळी पडून सीमा यांनी दोघांकडे ९ लाख २६ हजार २८ रुपये आराध्या व अमन यांच्याकडे भरले होते. मात्र त्यानंतर फक्त २० हजार ८९६ रुपये सीमा यांना परत मिळाल्याने आपली ९ लाख ५ हजार १३२ रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सीमा यांनी आराध्या व आमन निल या दोघांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.