ठाकरेसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग?, उदय सावंत यांची सभा

By सदानंद नाईक | Published: May 14, 2024 03:10 PM2024-05-14T15:10:07+5:302024-05-14T15:10:17+5:30

शिंदेंसेनेचे शिवसैनिक, पदाधिकारी तसेच मित्रपक्ष असलेले भाजपा, रिपाइं, ओमी टीम पक्षाचे पदाधिकारीर्यांनी प्रचार शिगेला पोहोचविला आहे.

A tunnel to Thackeraysena's fortress?, Uday Sawant's meeting | ठाकरेसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग?, उदय सावंत यांची सभा

ठाकरेसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग?, उदय सावंत यांची सभा

सदानंद नाईक
 उल्हासनगर : शहरातील ठाकरेसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मराठा सेक्शन येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सोमवारी रात्री उधोगमंत्री उदय सामंत यांची जाहीर सभा झाली. त्यांनी कल्याण लोकसभेची निवडणूक एकतर्फी असून श्रीकांत शिंदे किती लाखाच्या मताधिक्याने निवडून येथील हे ४ जूनला समजणार आहे.

शिंदेंसेनेचे शिवसैनिक, पदाधिकारी तसेच मित्रपक्ष असलेले भाजपा, रिपाइं, ओमी टीम पक्षाचे पदाधिकारीर्यांनी प्रचार शिगेला पोहोचविला आहे. ठाकरेसेनेची मध्यवर्ती शाखा मराठा सेक्शन येथे असून या शाखेचे उदघाटन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाल्याने, या शाखेला विषय महत्त्व आहे. तसेच या ठिकाणी फाळणीच्या वेळी निर्वासित झालेले सिंध मराठी कोकणी नागरिक मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी शिंदेंसेनेने सभा घेतल्याचे बोलले जात आहे. सभेत श्रीकांत शिंदे यांनीही मार्गदर्शन केले.

Web Title: A tunnel to Thackeraysena's fortress?, Uday Sawant's meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.