मुंबई-अहमदाबाद मार्गावर रॉकेल सदृश्य कच्च्या तेलाचा टँकर उलटला! टँकर चालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 19:34 IST2025-03-30T19:33:51+5:302025-03-30T19:34:48+5:30

आपत्कालीन स्थिती ओढवल्याने पोलिसांनी नियंत्रण मिळविले!

A tanker carrying crude oil resembling kerosene overturned on the Mumbai-Ahmedabad route! The tanker driver died. | मुंबई-अहमदाबाद मार्गावर रॉकेल सदृश्य कच्च्या तेलाचा टँकर उलटला! टँकर चालकाचा मृत्यू

मुंबई-अहमदाबाद मार्गावर रॉकेल सदृश्य कच्च्या तेलाचा टँकर उलटला! टँकर चालकाचा मृत्यू

हितेन नाईक
पालघर:- मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर मस्तान नाका उड्डाण पुलावरून ३० हजार लिटर क्षमतेचा केरोसीन सदृश्य कच्च्या रसायनाचा भरलेला टँकर रविवारी संध्याकाळी खाली कोसळल्याने आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी विशेष काळजी घेत हा भाग निर्मनुष्य केला.ह्या अपघातात टँकर चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मस्तान नाका उड्डाणपुलाच्या गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर टँकर पुलाच्या कठड्याला धडकल्यानंतर सुमारे वीस फूट उंचीवरून पुलाच्या खाली कोसळला.अपघात ग्रस्त टँकर मधून केरोसीन सदृश्य कच्च्या तेलाची गळती सुरु झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने कच्चे तेल ज्वलनशील नसल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.स्थानिकांच्या मदतीने अपघातात गंभीर जखमी टँकर चालकाला बाहेर काढून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असताना त्याचे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघाता नंतर अपघात ग्रस्त टँकर मधील गळती सुरु झाली होती. 30 हजार लिटर क्षमतेच्या टँकर मधून तेलाची मस्तान नाका भागातील दुकानदार, रिक्षा चालक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.मस्तान नाका परिसर ऑइलमय झाला होता.अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून बघ्यांच्या गर्दीला हटवून परिसर निर्ममनुष्य केला.तसेच उड्डाणपुला खालील गुजरात मार्गीकेवरील वाहतूक बंद केली होती.दोन क्रेनच्या साहाय्याने अपघात ग्रस्त टँकर रस्त्यावरून हटवण्यात आल्यानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

Web Title: A tanker carrying crude oil resembling kerosene overturned on the Mumbai-Ahmedabad route! The tanker driver died.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.