भिवंडीत सार्वजनिक शौचालयाच्या सेप्टीक टॅंकचा स्फोट, दुर्घटनेत एक ठार दोन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 18:07 IST2022-02-25T18:07:09+5:302022-02-25T18:07:32+5:30
भिवंडी महापालिकेकडून मागील १५ वर्षांपूर्वी हे सौचालय बांधण्यात आले होते.

भिवंडीत सार्वजनिक शौचालयाच्या सेप्टीक टॅंकचा स्फोट, दुर्घटनेत एक ठार दोन जखमी
भिवंडी- शहरातील चव्हाण कॉलनी येथील एका सार्वजनिक शौचालयाच्या सेप्टीक टॅंकमध्ये स्फोट होऊन त्यामध्ये एका वृद्धाचा दुर्देवी मृत्यू तर दोन जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. भिवंडी महापालिकेकडून मागील १५ वर्षांपूर्वी हे सौचालय बांधण्यात आले होते. महानगरपालिके कडून चव्हाण कॉलनी येथे सुमारे १५ वर्षां पूर्वी सदरचे सार्वजनिक शौचालय उभारले असून ते खाजगी ठेकेदार मार्फत परीचालना साठी दिले होते.
योग्य ती काळजी न घेतल्याने व सेफ्टीक टॅंकची स्वच्छता न राखल्याने शौचालयात काही नागरीक शौचास गेले असता तेथील शौचकूपा खालील टॅंकमध्ये स्फोट झाल्याने तेथे शौचास बसलेले दोघे जण टाकीत पडले त्यामध्ये ७० वर्षीय इब्राहिम शेख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. जखमी व्यक्तींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत .या दुर्घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पालिका आपत्कालीन कक्षास दिली असता भिवंडी महापालिका आपत्कालीन विभाग व अग्निशमन दलासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने मदत कार्य केले.