भिवंडीत रिक्षा चालकाची मुजोरी; महिला सफाई कर्मचाऱ्याच्या अंगावर थुंकून शिवीगाळ
By नितीन पंडित | Updated: September 6, 2022 17:29 IST2022-09-06T17:28:35+5:302022-09-06T17:29:30+5:30
मनपाच्या महिला सफाई कर्मचाऱ्याच्या अंगावर थुंकून केली शिवीगाळ

भिवंडीत रिक्षा चालकाची मुजोरी; महिला सफाई कर्मचाऱ्याच्या अंगावर थुंकून शिवीगाळ
भिवंडी: शहरातील रस्त्यावर झाडू मारत असताना एका रिक्षावाल्याने मनपाच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या अंगावर थुकला असता माझ्या अंगावर का थुकता अशी विचारणा केली असता मुजोर रिक्षा चालकाने महिलेसह मनपाच्या मुकादमास शिवीगाळ केल्याची घटना रविवारी मानसरोवर परिसरात घडली आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात मुजोर रिक्षा चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमिला संदीप मोरे वय ४७ वर्ष असे भिवंडी मनपा मधील सफाई कर्मचारी महिलेचे नाव असून त्या मानसरोवर परिसरात रविवारी सकाळी झाडू काम करत असताना त्यांच्या बाजूला उभी असलेला रिक्षाचा चालक विनोद शहाजी वाघमारे हा प्रमिला यांच्या अंगावर थुकला.त्यांनतर महिलेने जाब विचारला असता मी कुठेही थुंकेन तुला काय करायचे असेल ते करून घे, असे बोलत त्याने महिला सफाई कर्मचाऱ्यास शिवीगाळ केली. त्यानंतर कर्मचारी महिलेने मनपाचे मुकादम यशवंत मारुती चव्हाण यांना त्या ठिकाणी बोलावले असता त्यांनाही या रिक्षाचालक विनोदने शिवीगाळ केली. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा यासह इतर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे