उल्हासनगरात रिक्षा चालकाची टोळक्याकडून हत्या, दोघाला अटक, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 18:30 IST2025-08-02T18:28:57+5:302025-08-02T18:30:30+5:30
Ulhasnagar Crime News: कॅम्प नं-१, ममता हॉस्पिटल रस्त्यावर रिक्षा चालक साजिद सादिक शेख याची एका टोळक्याने शुक्रवारी रात्री २ वाजता धारदार शस्त्राने हत्या केली. याप्रकारणी उल्हासनगर पोलिसांनी खुणाचा गुन्हा दाखल करून दोघाना अटक केली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

उल्हासनगरात रिक्षा चालकाची टोळक्याकडून हत्या, दोघाला अटक, गुन्हा दाखल
उल्हासनगर - कॅम्प नं-१, ममता हॉस्पिटल रस्त्यावर रिक्षा चालक साजिद सादिक शेख याची एका टोळक्याने शुक्रवारी रात्री २ वाजता धारदार शस्त्राने हत्या केली. याप्रकारणी उल्हासनगर पोलिसांनी खुणाचा गुन्हा दाखल करून दोघाना अटक केली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
उल्हासनगरात शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान प्रवीण उज्जेनवाल, रोहित पारशी व इतर मित्र तसेच साजिद शेख व त्यांच्या मित्रांत अज्ञात कारणावरून भांडण झाले होते. भांडण मिटविण्यासाठी साजिद साजिक शेख याला मित्रासह साईबाबा मंदिर, ममता हॉस्पिटल रस्त्यावर शुक्रवारी रात्री प्रवीण उज्जेनवाल याच्यासह अन्य मित्राने बोलाविले. साई बाबा मंदिर येथे त्यांच्यात पुन्हा तू तू मै होऊन हाणामारी झाली. यामध्ये साजिद शेख याच्यावर कोयत्या सारख्या शस्त्राने वार करून खून करण्यात आला. असी माहिती उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी दिली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून प्रवीण उज्जेनवाल व रोहित पारशी यांना अटक केली.
मृत साजिद साजिक शेख हा रिक्षा चालक असून उल्हासनगर शेजारील वरप गावात राहणारा आहे. त्याची पत्नी ४ महिन्याची गरोदर असून तीने साजिदचा खून करणाऱ्या टोळक्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. खुनाची घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद होऊन सदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलिसांनी सीसीटिव्ही कॅमेऱ्यात साजिद शेखवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या प्रत्येकावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. गेल्याच आठवड्यात जेल मधून सुटून आलेल्या आरोपीच्या मित्रानी आरोपीची मिरवणूक काढून ढोल ताशे व फाटक्याच्या आतिषबाजीत स्वागत केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, उल्हासनगर पोलीसाच्या कारभारावर टिका झाली होती. पुन्हा एका टोळक्याने शुल्लक भांडणातून साजिक शेख याचा खून केल्याचे उघड झाले. अधिक तपास उल्हासनगर पोलीस करीत आहे.