मीरारोडमध्ये धावत्या रिक्षाला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 19:38 IST2023-01-12T19:36:57+5:302023-01-12T19:38:21+5:30
भररस्त्यात रिक्षाला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

मीरारोडमध्ये धावत्या रिक्षाला भीषण आग
मीरारोड - मीरारोडच्या रामदेव पार्क नाका येथे धावत्या रिक्षाला आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास घडली आहे. रिक्षा चालक धरमचंद्र वर्मा हे रिक्षा चालवत असताना अचानक भीषण आग लागली. आगीत पूर्ण रिक्षा जाळून खाक झाली आहे. केवळ लोखंडी सांगाडा शिल्लक राहिला.
अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. भररस्त्यात रिक्षाला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. वाहतूक यावेळी बंद करण्यात आली. रिक्षा चालकाचे सुमारे १ लाख ८० हजाराचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. आग लागण्याचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.