मीरारोडमध्ये नव्याने भरती झालेल्या पोलीस शिपाईनं संपवलं जीवन
By धीरज परब | Updated: October 7, 2024 20:23 IST2024-10-07T20:23:18+5:302024-10-07T20:23:37+5:30
Mira Road News: मीरारोड मध्ये नव्याने भरती झालेल्या २३ वर्षीय पोलिस शिपाईने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे . सागर सगोंडा अथनिकर मूळ रा. बेळुंखी, ता. जत , जिल्हा सांगली असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस शिपाईचे नाव आहे . स्वतःच्या आत्महत्येचा त्याने लाईव्ह व्हिडीओ बनवला होता.

मीरारोडमध्ये नव्याने भरती झालेल्या पोलीस शिपाईनं संपवलं जीवन
मीरारोड - मीरारोड मध्ये नव्याने भरती झालेल्या २३ वर्षीय पोलिस शिपाईने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे . सागर सगोंडा अथनिकर मूळ रा. बेळुंखी, ता. जत , जिल्हा सांगली असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस शिपाईचे नाव आहे . स्वतःच्या आत्महत्येचा त्याने लाईव्ह व्हिडीओ बनवला होता .
मीरारोडच्या अपना घर गृहसंकुलात सागर हा अन्य एका सहकारी पोलिसासह भाड्याने रहात होता . सहकारी पोलीस मित्र हा सागर झोपलेल्या खोलीत त्याला पाहण्यासाठी रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गेला असता सागर पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. सागर याने त्याचा मोबाईल खिडकीला लावला होता व त्याने आत्महत्या करतानाचे व्हिडीओ शूटिंग त्यात केले होते . मी जीवनाला कंटाळलो असून माझी कोणाच्या विरोधात काहीही तक्रार नाही असे त्यात सागर याने म्हटले होते .
काशीगाव पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले . २०२३ सालच्या पोलीस शिपाई भरतीत सागर हा मीरा भाईंदर - वसई विरार पोलिस आयुक्तालयात नोकरीस लागला होता . लातूर येथील बाबळगाव पोलीस प्रशिक्षण केंद्र येथून त्याने प्रशिक्षण पूर्ण केले. तो सध्या आयुक्तालयात मुख्यालयात नियंत्रण कक्षात कार्यरत होता.
पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष खांडेकर यांनी अधिक तपास चालवला आहे . पोलिसांनी आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झाले नसल्याचे म्हटले आहे .