उल्हासनगरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Updated: April 25, 2023 20:09 IST2023-04-25T20:09:48+5:302023-04-25T20:09:57+5:30
पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी विनयभंग व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला.

उल्हासनगरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
उल्हासनगर : कॅम्प नं-३ पूर्वेत राहणाऱ्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा प्रसाद आणण्याचा बहाणा करून अवतार नावाच्या इसमाने विनयभंग केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
उल्हासनगर पूर्वेत राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरा शेजारील एका धार्मिकस्थळी सकाळी प्रार्थना करण्यासाठी जात असे. १९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता मुलगी प्रार्थनास्थळावरून घरी निघाली असता, प्रार्थनास्थळी पाठण वाचण करण्याचे काम करणाऱ्या अवतार नावाच्या इसमाने मुलीला प्रसाद आणण्यास सांगितले. मुलीने प्रसाद आणल्यावर अवतार नावाच्या इसमाने त्याच्या राहत्या इमारती मध्ये मुलीचा विनयभंग केला. याप्रकारने घाबरलेल्या मुलीने घडलेला सर्वप्रकार आई वडिलांना सांगितला. याप्रकारने त्यांना मानसिक धक्का बसला. त्यांनी दुसऱ्या दिवशी मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी विनयभंग व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला.
मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होऊन ५ दिवसाचा कालावधी उलटला आहे. मात्र आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही. आरोपी प्रार्थनास्थळी वाचन व पठण करणारा असल्याने, त्याला राजकीय नेते व पोलीस पाठबळ देत असल्याचा आरोप मुलीच्या आई वडील करीत आहेत. आरोपी अटकपूर्व जामीन घेण्याच्या तयारीत असून त्यापूर्वी पोलिसांनी अटक करावी. अशी मागणी शहरातून होत आहे. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी आरोपीच्या मार्गावर पोलीस असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.