भिवंडीत मनसे शहरप्रमुखाच्या हद्दपार व टोरंट पावर विरोधात मोर्चा
By नितीन पंडित | Updated: February 27, 2024 17:49 IST2024-02-27T17:49:09+5:302024-02-27T17:49:58+5:30
मोर्चात शेकडो महिला युवक व नागरिक तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते.

भिवंडीत मनसे शहरप्रमुखाच्या हद्दपार व टोरंट पावर विरोधात मोर्चा
नितीन पंडित,भिवंडी: महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी शहर प्रमुख मनोज गुळवी यांच्यावर केलेली हद्दपार कारवाई व टोरंट पावरचा मनमानी कारभार याविरोधात मंगळवारी भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सर्व पक्षीय टोरंट पॉवर विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात शेकडो महिला युवक व नागरिक तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मनोज गुळवी यांनी टोरंट पॉवर विरोधी आंदोलनाचे नेतृत्व करीत पुढाकार घेतला होता.भर पावसात हजारो नागरीक या आंदोलनात सहभागी झाले होते.जनतेचा राग टोरंट पॉवर विरोधात आहे.त्यांच्या मनमानी पणाला विरोध असल्याने तो राग व्यक्त करण्या साठी जनता सहभागी झाली होती.त्याचा राग म्हणून ही कारवाई होत असेल तर ही कारवाई निंदनीय आहे अशी प्रतिक्रया आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
सरकार हे जनतेचे असते,जनतेचे असायला हवे जनतेचा रोष संताप हा सरकारने समजून घ्यायला हवा त्यासाठी कोणत्याही खाजगी कंपनीला सरकारने पाठीशी न घालता जनतेला न्याय दिला पाहिजे अशी भूमिका मनसे प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.